"रक्तदान करा, राष्ट्रीय एकात्मता वाढवा."
-भारती दिनेश तिडके,गोंदिया
14 जून हा "जागतिक रक्तदाता दिन "म्हणून रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. यानिमित्त रक्तदानाचं महत्व सांगणारा भारती दिनेश तिडके,गोंदिया यांचा लेख -संपादक
रक्तदान हेच जीवनदान
"रक्तदान आहे जीवनदान
जे वाचवते दुसऱ्याचे प्राण."
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी सव्वाशे वर्षांपूर्वी मानवी रक्तगटाचा शोध लावला. रक्तदानामुळे आज हजारो-लाखो लोकांना जीवनदान मिळते. त्यामुळे" रक्तदान हेच जीवनदान "असे म्हटले जाते. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. मात्र आजही समाजात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्या रक्तदा त्याला रक्त दानासाठी प्रेरित करण्यासाठी व नियमित रक्तदात्याची आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिवस साजरा करीत आहे.
ए बी ओ या रक्तगटाचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाची नोबेल विजेते प्राप्त डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक रक्तदान दिन आयोजिला जातो.
" चला रक्तदान मोहीम राबवू या,
रक्तदान करून जीव वाचवू या."
रक्तदाता दिवसाची थीम ही "सेफ ब्लड फॉर ऑल" सुरक्षित रक्त सर्वांना आहे. एकदा संक्रमण झाले की वेळ हातून गेली असते त्या अनुषंगाने सर्वांना सुरक्षित आणि शुद्ध रक्त मिळावे यासाठी जागृती करणे आवश्यक आहे. काही आजारांवर उपचार करतांना रुग्णाला रक्त मिळाले नाही तर दगावण्याची शक्यता वाढते. शिवाय थॅलेसिमिया , सिकल्सेलच्या रोग्यांना नियमित रक्त देणे गरजेचे आहे. मात्र सध्या रक्ताची उणीव मोठ्या प्रमाणात भासते हे देखील खरे आहे. भारतात एकूण लोकसंख्येच्या केवळ 0.9 टक्के लोक नियमित रक्तदान करतात. एकूण गरजेच्या अनेकपटीने कमी आहे. विकसित देशात रक्तदान करण्याचे हेच प्रमाण चार टक्क्यापर्यंत आहे. म्हणून यंदाच्या थीम मध्ये सर्वांसाठी रक्त हे महत्त्वाचे ध्येय आहे.
अशावेळी तरुणांनी मोठ्या संख्येत रक्तदान केले पाहिजे. रुग्णांना अधिक सुरक्षित व शुद्ध रक्त कसे मिळेल याकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात जागृती करणे हे रक्त दाता दिवसाचे आणखी उद्दिष्ट होय. एक पिशवी रक्त दिल्याने तब्बल तीन लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. रक्त चढण्यापूर्वी रक्ताची ब्लड बँकेत तपासणी होते. त्यामुळे आयडी नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त स्वीकारण्यास प्राधान्य द्यावे. रक्तदान केल्यानंतर रक्त दाताच्या रक्तात वाढ होते व नवीन रक्त तयार होते. रक्तदान केल्यावर रक्तदात्याचा हृदयविकाराचा धोका कमी होतो. फिटनेस येते. आज काही समाजसेवकांनी हजारो रक्तदात्यांना विविध संघटनाद्वारे एकत्र आणल्यामुळे समाजात रक्तदानाची चळवळ जोमाने सुरू आहे. म्हणून 14 जून हा "जागतिक रक्तदाता दिन "म्हणून रक्तदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
-भारती दिनेश तिडके,
रामनगर गोंदिया
8007664039




No comments:
Post a Comment