अनमोल भेट- रक्तदान
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
“दानात दान रक्तदान”
गोष्ट आहे 2005 ची. माझ्या जीवनातील पहिला रक्तदानाचा प्रसंग. आमचे मोठे बंधू (भाऊजी). किडणीच्या आजाराने त्रस्त होते. डायलेशिस प्रक्रियेचा उपयोग करून प्रकृती सुधारण्याच्या डाँक्टर कसोशीने प्रयत्न करू लागले. पण प्रकृती दिवसेंदिवस खालावतच होती. आता वेळ येऊन पोहचली ब्लड- डायलेशिसची. रक्ताच्या शोधात परिवारांची भटकंती सुरू होती. रक्तगट B + शोधाशोध सुरू होता. मी पहिल्यांदा रक्तदान करण्याचा मनाचा निर्धार पक्का केला. घरी आपले विचार सांगितले. घरच्यांनी माझ्या निर्णयाचा आदर केला आणि आम्ही त्याच दिवशी गोंदिया वरून नागपूरला निघालो.
माझ्या रक्तगट पुन्हा तपासला गेला. त्यावेळी डाँक्टरांचा पहिला प्रश्न ,"तुम्हाला कोणी जबरदस्तीने पाठविले का ? भिती वाटते का ?" मी ,"नाही "म्हणाली. त्यावेळी माझ्या मनात एकच विचार सुरू होता. तो म्हणजे भाऊजींचे प्राण वाचले पाहिजे. ह्या पहिल्या रक्तदानानंतर आजपर्यत 5 सप्टेंबर शिक्षकदिन आणि 13 मे श्री श्रीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचेवीस वेळा रक्तदान केले आहे. अनेकांना रक्तदानास प्रवृत्त करून नेत्रदानाचा संकल्प घेतलेला आहे
मानवाची निर्मिती ही निर्मिकाची सर्वात श्रेष्ठ कलाकृती आहे. मानवाचे जीवन म्हणजे निर्मिकाने दिलेली मोठी देणगी आहे. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करतात . एका मानवानेच रक्त मानवाचे जीव वाचून शकतो. दुसऱ्यावर मरण्याची पाळी अपघातात येत असते. अतिरिक्त रक्तस्त्राव , रक्तक्षय , कर्करोग आणि इतर गंभीर आजारांमध्ये रोग्याला रक्त मिळाले नाही तर, तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते .
अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचू शकतात. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवाचे प्राण वाचू शकत नाही. मानवाचे रक्तदान हे मानवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्तकरून देते.
"रक्तदान आहे जीवनदान ,कारण यामुळेच वाचतात अनेकांचे प्राण "
दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही अत्यावश्यक गरज भागविण्यासाठी फक्त 70 ते 75 टक्के पर्यायी रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदान कडून ही अत्यावश्यक गरज भागविली जात आहे. आता इच्छुक रक्तदात्यांची काळाला गरज आहे. मानवाच्या शरीरात साडेचार ते पाच लीटर रक्त शरीरामध्ये असते . केवळ 300ml रक्त काढले जाते . रक्तदानानंतर छत्तीस तासांनी साधारणतः रक्ताची पातळी पूर्ववत होते . साधारणतः दोन ते तीन आठवड्यामध्ये रक्तपेशी पूर्ववत होतात. दान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही. रक्तदान केल्यानंतर २० ते ३० मिनीटे विश्रांती नंतर ती व्यक्ती पुर्ववत काम करु शकते. रक्तदान करण्यासाठी साधारणतः १८ पेक्षा जास्त व ६० पेक्षा कमी वय लागते. वजन ५० किग्रॅ पेक्षा जास्त हवे. हिमोग्लोबिन १२.५% पेक्षा जास्त असावेत.
काविळ, मलेरिया, टायफ़ाइड, डेंग्यु, चिकनगुनिया, एका वर्षामधे कोणतीही शस्त्रक्रिया झाली असल्यास, अनेमिया असल्यास, गुप्तरोग, क्षयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे काही असाध्य आजार किंवा वयोपरत्वे आजार असल्यास रक्तदान करु नये. तसेच रक्तदाताच्या हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांना नाकारले जाते . अशा वेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविण्यासाठी खालील आहार घ्यावा. पालेभाजी- माठ, मेथी, चवळी व पालक, मोड आलेली कडधान्ये, फळे - चिकु, पपई, सफरचंद, आवळा, कलिंगड, केळे, संत्री, मोसंबी, द्राक्षे, ओला खजुर, भाज्या- ओले वाटाणे, भोपळा, सर्व हिरव्या फळभाज्या, पडवळ, परवर, गवार, चहा व पावटे खाण्याचे टाळावे.
रक्तदानास येण्यापुर्वी रात्री शांत झोपणे, आपला नियमित आहार घेणे विनाकारण कोणतेही औषध/गोळ्या घेऊ नयेत.
"आपल्या वाढदिवसाला वाचून एखाद्याचे प्राण ,अनमोल भेट देऊन करूया रक्तदान"
रक्तदानाचे फायदे : शरीरात नवीन रक्ताची निर्मिती होते, रक्तदानाचं ‘ब्लड डोनर’कार्ड मिळतं. आवश्यकता पडल्यास त्या कार्डावरून दात्याला विनामूल्य रक्त मिळतं, तुमच्या रक्तदान दुस-या रुग्णांसाठी जीवनदायी वरदान ठरतं. दान केलेल्या रक्ताचं पुढं काय होतं? : रक्तपेढयांमध्ये दान केलेल्या रक्ताचा गट निश्चित केला जातो. त्यानंतर रक्ताच्या एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजारांच्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांनंतर रक्त रक्तपेढ्यांमधून वेगळं केलं जातं. काही वेळा रक्तातील विविध घटक वेगळे केले जातात. जसं की, फ्रेश फ्रोझन प्लाज्मा, पॅकसेल ब्लड, सिरम इत्यादी.
भाजलेले रुग्ण, अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, गंभीर अत्यवस्थ रुग्ण यांना हे रक्त दिले जातं. रक्तदानानंतरची काळजी पुढीलप्रमाणे घ्यावे. रक्तदानानंतर लगेच शारीरिक श्रम, खेळणं, धावणं यापासून दूर राहावं. रक्तदानानंतर कमीत कमी ४८ तासांपर्यंत तरी मद्यपान करू नये. रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं जड वाहन चालवू नये. भरपूर पाणी प्यावं.
"रक्त दान करून जोडा नवीन नाते ,असे केल्याने आपले काय जाते ?"
रक्तदान कुठे करावं? कोणत्याही शासकीय रुग्णालयातील महानगरपालिका, रुग्णालय ज्या ठिकाणी रक्तपेढीची सोय आहे, त्या ठिकाणी करावं. मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. कोणत्याही कारखान्यात रक्ताची निर्मिती होत नाही. रक्त फार काळ साठवता येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारेच रक्ताची गरज पूर्ण होते. थॅलसिमीया, सिकलसेल, पंडू रोग आजाराने ग्रस्त बालकांना, कर्परोगाने ग्रस्त रुग्णांना रक्ताची नियमित आवश्यकता असते. कुणाला कधी आणि कुठे रक्ताची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिटमधून रक्त व रक्त घटक वेगळे केले जातात. (तांबड्य़ा पेशी, रक्तिबबीका (प्लेटलेट्स) व प्लाझमा) अशापकारे आपल्या रक्तदानाने 1 ते 3 रुग्णांचे प्राण वाचू शकतात.
-यशोधरा सोनेवाने, गोंदिया
( 9420516306 )



No comments:
Post a Comment