नांदेड :आज सोमवारी (दिनांक १/०६/२०२० रोजी ) प्राप्त झालेल्या एकूण ५६ अहवालापैकी ४१ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. ०६ अहवाल हे पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळेमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २६२ एवढी झाली आहे .
यातील १ पुरुष बरकतपुरा, नांदेड वय वर्ष ३२ आहे तर उर्वरित ५ रुग्ण हे विठ्ठल मंदिर मुखेड येथील असून त्या रुग्णांपैकी ३ पुरुष वय वर्ष अनुक्रमे ४७,५२ व ६२ आहेत आणि २ स्त्री ज्यांची वय वर्ष अनुक्रमे ५२ व ५५ आहेत. आतापर्यंत २६२ रुग्णांपैकी १७७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे व उर्वरित ७२ रुग्णांवर औषधपचार चालू असून त्यातील ३ रुग्ण त्यापैकी ०१ स्त्री रुग्ण ज्यांचे वय ५२ आणि ०२ पुरुष ज्यांचे वय ५२ व ५४ वर्ष असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
दि . १५/०६/२०२० रोजी कोरोना संशयित व कोविड रुग्णांचा संक्षिप्त माहिती तक्ता : सर्वेक्षण १४५३२३, घेतलेले स्वेब ५२९८, निगेटिव्ह स्वॅब ४४००,आज रोजी पॉझीटीव्ह स्वॅब संख्या ६, एकूण पॉझीटीव्ह रुग्ण २६२, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या २००,स्वॅब नाकारण्यात आलेले संख्या ८३, मृत्यू संख्या१३, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली संख्या १७७, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ७२, स्वॅब तपासणी रुग्ण संख्या २७९.
दिनांक १५/०६/२०२० रोजी ३४६ सॅब तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण २६२ रुग्णांपैकी १३ रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व १७७ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. उर्वरित ७२ रुग्णांपैकी डॉ . शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे २८ रुग्ण , पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे एकूण ४२ तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ७ उपचारासाठी दाखल असून ५ रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत . तरी जनतेने अफवांवर विश्वासु ठेवु नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे . तसेच सर्व जनेतेने आपल्या मोबाईलवर “ आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ऍप सतर्क करण्यास मदत करते. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment