-भारती दिनेश तिडके, गोंदिया
लखुजी जाधव निजामशाहीचे पहिल्या प्रतीचे सरदार ते मोठे पराक्रमी होते. लखुजी रावाकडे सिंदखेड ची जहागीर होती. जाधवांचे घराणे हे मराठ्यांचे 96कुळापैकी एक होते. अशा या थोर घराण्यात जिजाबाई चा जन्म 12 जानेवारी इसवीसन 15 98 रोजी झाला. जिजा ही लखुजीराव यांची लाडकी मुलगी होती. त्यातून रुपाने सुंदर आणि गुणी.
जाधव राव व भोसले दोघेही निजामशाहीत नोकरीत असल्याने त्यांचे एकमेकांकडे जाणेयेणे असे. त्यानंतर जिजाबाई चे लग्न जमले. मुहूर्त ठरला आणि शुभमुहूर्तावर शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांचे लग्न मोठ्या थाटामाटाने इसवी सन सोळाशे पाच मध्ये झाले.
कालांतराने भोसले व जाधवांचे वैर झाले. आता जाधवराव मोगलशाहीत गेले तर शहाजीराजे निजामशाहीत राहिले. म्हणजे सासरा विरुद्ध जावई अशी उघड उघड लढाई सुरू झाली. वैमनस्य निर्माण झाल्यानंतर जिजाबाई यांनी पती निष्ठेला महत्व देत माहेरशी कायमचे संबंध तोडले. भावनांना आणि नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्त्व देत खंबीरपणे व धैर्याने त्या प्रसंगात उभ्या राहिल्या. निजाम शहा वारल्यानंतर परत मोगलांची स्वारी झाली. जिजाबाईंना बरोबर घेऊन शहाजीराजांनी पळ काढला त्यावेळी त्या गरोदर होत्या. त्यामुळे शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. गरोदर जिजाबाईंना विलक्षण डोहाळे लागत होते. कधी हत्तीवर, घोड्यावर बसावे. गड चढावेत, चिलखत घालून लढाईला जावे असे त्यांना वाटत होते. दिनांक 19 फेब्रुवारी 1930 ची रात्र आली ती एक सुखद वार्ता घेऊन. जिजाबाईंना मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्यांची संपूर्ण जबाबदारी जिजामातेने स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं. शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जबाबदारी सोपवल्या ने त्या शिवाजी महाराजांचा समवेत पुणे येथे आल्या. शत्रूचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती. त्यांनी पुण्याची जबाबदारी समर्थपणे पेलली. पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतकऱ्यांना मदत करणे, तंटे सोडवणे या सारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या जडणघडणी कडे देखील बारकाईने लक्ष देत.
शिवाजी महाराजांना कर्तुत्ववान योद्धाच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढ्य आणि पराक्रमी भीम अर्जुनाच्या गोष्टी सांगून त्यांच्यावर संस्कार करीत होत्या. व शस्त्रविद्येत त्यांना निपूण करताना स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या. शिवाजी महाराजांवर संस्कार करत असताना त्यांनी त्यांना कर्तव्य बरोबरच राजनीति देखील शिकवली. शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हा कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाऊ मा साहेबांनी राज्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे पेलली.
आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजां करवी पूर्ण करून घेतली आणि त्याकरिता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमध्ये पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले.
इसवी सन 16 74 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तीन घटका रात्र उरली असताना पहाटेस महाराजांचा राज्याभिषेकाचा विधी पूर्ण होऊन राजे मोठ्या थाटाने सिंहासनारूढ झाले. राज्याभिषेकाच्या या सोहळ्याला रायगडावर सुमारे अकरा हजार लोक जमले होते. हा सोहळा दृष्ट लागण्यासारखा होता. जिजामाता ते पाहून अगदी तृप्त झाल्या. कित्येक वर्षांचे त्यांचे स्वप्न आज साकार झाले होते. राज्याभिषेक झाल्यानंतर बारा दिवसांनी जिजामातेने 17 जून इसवी सन 16 74ला रायगडाच्या पायथ्याशी पाचड या गावी शेवटचा श्वास घेतला. जणू छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक होण्याचीच त्यांना प्रतीक्षा होती. महाराष्ट्राला छत्रपती मिळाले म्हणून स्वराज्य हसत होते; आता राजमाता गेली म्हणून ते दुःख सागरत बुडाले होते.
स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजामातेचे जीवन हे असे अलौकिक होते .जय जिजाऊ.
-भारती दिनेश तिडके,
रामनगर गोंदिया
8007664039




No comments:
Post a Comment