-भारती सावंत, मुंबई
काळ्या रानच्या या मातीत
कष्ट करूनी सारी दिनरात
सोने पिकवतोय बाप त्यात
पिकं डोलतंय हे शिवारात
गहू हरभरा मका नि शाळू
टरारती वर या मातीमधुनी
पिक येताच बघ राखणीला
फिरे गोफण मचाणावरूनी
मायाळू असे माय सुगरण
शिजविते अन्न निगुतीने
काळजातल्या या नात्यांसाठी
सांभाळते सारा संसार नेकीने
सर्जाराजा इमानी बैलजोडी
करती धन्याची सदाच सोबत
चालवुन फाळ नांगराचा रानी
मदतीला आहे हा सखा हैबत
गोठ्यांत गाईगुरांचे खिल्लार
मिळे दही दूध न् तुपाची धार
हिरवागार चारा घालतो बाप
नसे कष्टाला कुणाची माघार
-भारती सावंत,
मुंबई




No comments:
Post a Comment