पेरणी करतांना बळीराजा कन्येला शेतात पोस्ट बँकेने उचलून दिले बँकेतील पैसे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, June 17, 2020

पेरणी करतांना बळीराजा कन्येला शेतात पोस्ट बँकेने उचलून दिले बँकेतील पैसे



किनवट :  मागील आठवड्यात मोसमी पाऊस  झाल्याने जिल्ह्यात खरीप पेरणीला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. भिशी येथील शेतकरी कन्या सुरूबाई गायकवाड यांनी बुधवारी (दि.१७ ) ज्वारी, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग,तूर या बियाणी पेरणी चालू  केली.
 त्यांना पेरणी करतांना बियाणे व मजूरीसाठी पैसे कमी पडले होते.बाहेर गावी जाऊन बँकेतील पैसे काढण्याइतका वेळ शेतकरी कन्येजवळ नव्हता. शेतात पेरणीसाठी वीस महिला,पुरुष मजुरीचे होते. त्या शेतकरी कन्येने पोस्ट बँकेचे ब्रँच शाखा पोस्ट मास्तर ज्ञानेश्वर नूनेवार यांना मोबाईलद्वारे पैशाची मागणी केली. ब्रँच पोस्ट मास्तर नूनेवार यांनी  सदरील शेताचा पूर्ण पता घेऊन  त्यांचे शेत गाठले. कन्येचा एक हात पेरणी यंत्रणावर दुसरा हाताचा आंगठा पोस्ट बँकेच्या यंत्रणावर ठेवला आणि ब्रँच पोस्ट मास्तर यांना आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर सांगितला. काही सेकंदात मोबाईलवर ओटीपी नंबर आला व शेतकरी कन्या सुरूबाई गायकवाड यांच्या मागणीप्रमाणे त्यांना एईपीएस प्रणालीद्वारे पोस्ट बँकेच्या मार्फत पैसे काढून दिले.
            नांदेड जिल्ह्यातील सर्व वाड्या तांड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे डाक अधीक्षक शिवशंकर बी. लिंगायत यांनी ग्राम पातळीवर मागणीनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर  पोस्ट बँकेच्या मार्फत पैसे पुरवठा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे डाक आधीक्षक यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कोणत्याही बँकेतील, बँक खात्यातील पैसे आधार कार्ड व मोबाईल क्रमांकांनी उचलून देण्याची व्यवस्था देशातील फक्त पोस्ट बँकेने सुरू केली आहे.
शेतकऱ्यांचे जय जवान जय किसानचे स्वप्न पोस्ट बँकेमुळे पूर्ण होत आहे. अशी शेतकऱ्यांत चर्चा होत आहे.
            पेरणी करताना ब्रँच पोस्ट मास्तर गे पैसे दिल्याचे समजताच किनवटचे डाक निरीक्षक आभिनव सिन्हा व नांदेडचे इंडिया पोस्ट बँकेचे प्रबंधक राजेंद्र मंगनाळे यांनी भिशीचे ब्रँच पोस्ट मास्टर नूनेवार यांचे मोबाईलद्वारे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News