-शिवमती अर्चना गरूड,किनवट
राजे लखुजी राणी म्हाळसापोटी
जन्मली ऐसी जिजाऊ बिजली
ज्यांच्या शौर्य धैर्यापुढे
मुघलांची डाळ नाही शिजली
सुसंस्कारी स्वाभिमानाच्या होत्या
धगधगत्या झंझावाती मशाल
स्वराज्य संस्थापक निर्माते दिले
छत्रपती शिव शंभू थोर रत्ने लाल
आखिल मानवजातीच्या होत्या
माँ जिजाऊ आदर्श ठेवा
रंजल्या गांजल्यांची केली
राजे शहाजीसह अखंड सेवा
जगी स्त्रीमुक्तीच्या होत्या
त्या एक आद्य मूर्तिमंत आदर्श
तेजस्वी बौध्दिक कतृत्वाने
घडविले शिवशाही उत्कर्ष
अंधश्रद्धा , धर्म , रूढी , परंपरावादा
पुरोगामी प्रबोधनकर्तीनी दिला ऐसा छेद
स्त्री पुरूष समानता आणून
मिटविला जात , वंश , वर्ण मतभेद
त्यांच्या हळव्या ह्दयांतून
प्रकटतो शूर हिरकणी सत्कार
रांझे पाटला तिव्र शिक्षेतून
दिसे कर्तव्यकठोरतेचा अवतार
न भूतो न भविष्यति ऐसी
भारता भाग्यशाली जिजाऊमाता
आज स्मृतिदिनी माँ साहेब
तुम्हां प्रतिमेस नमवितो माथा
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
✍️ शिवमती अर्चना गरूड
किनवट , जि. नांदेड
मो. क्र. 9552963376




No comments:
Post a Comment