जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची पॉझिटिव्ह बधितांशी विचारपूस : कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, June 18, 2020

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची पॉझिटिव्ह बधितांशी विचारपूस : कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी




नांदेड  : गुरुवार (ता. 18 ) वेळ दुपारी तीनची. पावसाची रीमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा या वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात. 
            त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड हेही असतात. संपूर्ण परिसराची पाहणी करुन ते एका-एका गोष्टीचा आढावा घेतात. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महानगरपालिकाअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तात्काळ कशी करता येईल याचे नियोजन सुरु असते. याच नियोजनात प्रत्यक्ष विष्णुपुरी प्रकल्पाला जावून तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते. 
              तथापि कोविड डेडीकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. 

त्यांच्या सोबत असलेल्या डॉक्टरांची काळजीवजा धांदल उडते. पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडीकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या सर्व 17 बाधितांबरोबर ते मनमोकळ्या गप्पा मारतात. स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी करीत असल्याने काही पेशंटचे हात नकळत जोडले जातात. 'इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का ? काही अडचणी आहेत का ? आहार चांगला मिळतो का ? याची ते सरळ पेशंटला विचारणी करतात.' उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा उत्तम असल्याचे सांगत कोविड पेशंट आपला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. "घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल" असा विश्वास डॉ. विपीन प्रत्येकाच्या मनात पेरत सरळ शौचालयाच्या पाहणीसाठी वळतात. सोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना होतात. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News