21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त प्रत्येक घरात योगाचे महत्व रुजण्यासाठी विशेष कार्यक्रम - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, June 20, 2020

21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त प्रत्येक घरात योगाचे महत्व रुजण्यासाठी विशेष कार्यक्रम



नांदेड  : कोविड 19 या संसर्गजन्य आजाराने घातलेले थैमान रोखण्यासाठी प्रत्येकाने व्यक्तीगत पातळीवरील अंतराचे भान ठेवत मास्कच्या वापरासह अधिकाधिक निरोगी शरीर ठेवण्याशिवाय पर्याय नाही. निरोगी आयुष्याचा मंत्र योगविद्याच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीने अवघ्या जगाला दिला आहे. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी कोणताही खर्च न लागणारा योगाचा हा उपाय प्रत्येक नागरिकात रुजावा यासाठी आयुष संचालनालयाने आवाहन केले आहे. योगाभ्यासाचे महत्व लक्षात घेता त्याच्या प्रसारासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पाळला जातो. जिल्ह्यात हा संदेश अधिक प्रभावीपणे घराघरात पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेतला असून उद्या रविवार 21 जून रोजी सकाळी 7 वा. जिल्हा माहिती कार्यालय नांदेडच्या https://www.facebook.com/dionanded/  या वेबपेजवरुन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील हे सुसंवाद साधतील.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News