योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर ; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून प्रशासनाने दिला योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, June 21, 2020

योगाभ्यास जीवनाचा अविभाज्य भाग व्हावा -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर ; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून प्रशासनाने दिला योगाभ्यासाचा कृतीशील मंत्र



नांदेड  : पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणाऱ्या योग विद्येची भारताने संपूर्ण जगाला अनमोल देणगी दिली आहे. सुदृढ आरोग्यासाठी योगाभ्यासासारखे सहज सोप्या पद्धतीने व कोणताही खर्च न लागणारे असे प्रभावी माध्यम प्रत्येकाजवळ उपलब्ध आहे. कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात योगाभ्यासाची जीवनशैली प्रत्येकाच्या अंगी रुजल्यास आपल्याला अधिक सुरक्षित होता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 
               आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळी शासनाच्या निर्देशाचे पालन करीत जिल्हाधिकारी प्रशासनातील निवडक अधिकाऱ्यांनी योगाभ्यास करुन हा संदेश घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न केला.
हा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/dionanded/  या फेसबुक पेजवरुन लाईव्ह करण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत जागतिक योग दिवसाचा कृतिशील संदेश पोहोचविणे शासकीय झाले. 
आंतरराष्ट्रीय योगासन साधक श्रेयस मार्कंडेय व डॉ शर्मीली पाटील यांनी योगाभ्यासाचा सराव घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. शरद मंडलिक हे शारीरिक सुरक्षितताचे नियम पालन करीत सहभागी झाले. 
योग ही जीवनशैली असून ती प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे अशी अपेक्षाही डॉ. विपीन यांनी व्यक्त केली. निरोगी आयुष्यासाठी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक एकात्मता तेवढीच आवश्यक असते. या तीन सुत्रांना योगाभ्यासाद्वारे स्वत:च्या मनावर ताबा मिळविता येणे शक्य होते. शारीरिक स्वास्थाबरोबर मनस्वास्थही अधिक महत्वाचे असून योगाभ्यासाद्वारे हे सहज साध्य होते, असेही डॉ. विपीन यांनी सांगितले. यावेळी शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. यशवंत पाटील यांनी योगाचे महत्व विशद केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News