कोरोनातून 19 व्यक्ती झाले बरे; नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, June 22, 2020

कोरोनातून 19 व्यक्ती झाले बरे; नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह


नांदेड  : कोरोना आजारातून आज 19 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 14 व मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 238  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 59 अहवालापैकी 45 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तसेच आदिलाबाद येथून 1 बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 317 एवढी झाली आहे.
             नवीन बाधितांमध्ये धोबी गल्ली गाडीपुरा येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, रहेमतनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, विलालनगर येथील 37 व 57 वर्षाचे 2 पुरुष, पिरबुऱ्हानगर येथील 26, 29, 31 वर्षाचे 3 पुरुष आणि भगतसिंग रोड येथील 58 वर्षाचा 1 पुरुष तसेच नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 18 व 38 वर्षाचा 2 महिला, चिखलभोसी 45 वर्षाची 1 महिला आणि रिसनगाव येथील 19 वर्षाची 1 महिला यांचा समावेश आहे. हे सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
               आतापर्यंत 317 बाधितांपैकी 238 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 65 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 4 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50 व 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 व 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात 65 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 7 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.

जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 127,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 747,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 30,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 12,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 317,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 02,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 238,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 65,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 59 एवढी संख्या आहे.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 22/06/2020 वेळ 06.00 PM

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 5730
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 5396
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 3038
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 82
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 21
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 5375
•   आज घेतलेले नमुने - 39
• एकुण नमुने तपासणी- 5747
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 317 (पैकी ०४ संदर्भीत आलेले आहेत)
• पैकी निगेटीव्ह - 5030
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 59
• नाकारण्यात आलेले नमुने -91
• अनिर्णित अहवाल – 245
•       कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 238
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 14
• जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 146127 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News