नांदेड : कोरोना प्रादुर्भावापासून बचावासाठी घर मिळावे या मागणीसाठी स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही रस्त्यावर पाल मारुन राहणाऱ्या पारधी समाजाच्या वतीने संचारबंदीची पर्वा न करता सोमवारी (ता. १३ ) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "पाल मारो " आंदोलन करणार असल्याचे श्याम निलंगेकर यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.
देशात कोरोना वेगाने पसरला आहे . त्यामुळे ह्या रोगापासुन बचावासाठी जिल्हाधिकारी यांना पारधी समाज संवर्धन समिती, नांदेडच्या वतीने ११जून निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत. कोरोना रोगापासुन मुक्तता करण्यासाठी आमची निवाऱ्याची व्यवस्था करावी, आमच्या मुलांना शिक्षणासाठी हंगामी वसतीगृहाची व्यवस्था करण्यात यावी, आमचे आधारकार्ड , मतदान कार्ड , राशनकार्ड तयार करुन आम्हास भारतीय नागरीकत्व द्यावे.
तसेच एकनिष्ठ प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने नांदेड- वाघाळा महानगर पालिका आयुक्त यांना ता.पत्र देऊन हंगामी वसतीगृह उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने या मागण्यासाठी पारधी समाज संवर्धन समिती नांदेडच्या वतीने संचारबंदी लागू असली तरीही ता.१३ जुलै २०२० पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “ पाल मारो " आंदोलन करण्यात येईल. असे कष्टकरी, उपेक्षितांचे लढवय्ये नेते श्याम निलंगेकर व यांनी कळविले आहे.
या आंदोलनात पारधी समाज संवर्धन समितीचे अध्यक्ष : नंदाबाई शिंदे, उपाध्यक्ष : प्रभावती वाघमारे, सचिवः जयकुमार डोईबळे, सहसचिव:सिध्दार्थ गायकवाड,कोषाध्यक्ष : तिल्या भोसले, सदस्य : रामभाऊ काळे, महादेव भोसले, विक्रम काळे, किशन गायकवाड, छैला पवार, प्रदीप परतागे, सुरेश गायकवाड आदीजन सहभागी होत आहेत.




No comments:
Post a Comment