नांदेड जिल्ह्यात 51 बाधितांची भर कोरोनातून आज 15 व्यक्ती बरे तर तिघांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, July 20, 2020

नांदेड जिल्ह्यात 51 बाधितांची भर कोरोनातून आज 15 व्यक्ती बरे तर तिघांचा मृत्यू


नांदेड  :  जिल्ह्यात आज 20  जुलै रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 51 व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 33 तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 18 बाधित आहेत. 15 व्यक्ती आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या एकूण 332 अहवालापैकी 223 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 986 एवढी झाली असून यातील 515 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे. 423 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 31 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे.
               रविवार 19 जुलै रोजी हिंगोली नाका नांदेड येथील 64 वर्षाची एक महिला तर देगलूर नाका येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यांना उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे इत्यादी आजार होते. सोमवार 20 जुलै रोजी नायगाव येथील 26 वर्षाच्या एका महिलेचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. महिलेस किडनीचा गंभीर आजार होता. दोन दिवसात एकुण 3 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 49 एवढी झाली आहे. यात 42 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 7 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत.
               आज बरे झालेल्या 15 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 1, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 4, बिलोली कोविड रुग्णालयातील 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 5, औरंगाबाद येथील संदर्भित करण्यात आलेले 2 बाधित तसेच खाजगी रुग्णालयातील एका बाधिताचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण 515 बाधित व्यक्तींना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे.  
              नवीन बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 2, मुखेड समतानगर 3, देगलूर शारदानगर 1, लोहा मोंढा मार्केट यार्ड 1, नायगाव सिद्धार्थनगर 1, नायगाव तालुक्यातील कोलंबी 1, कंधार विजय सुलेमान टेकडी 1, मुखेड शिवाजीनगर 2, मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद 6, मुखेड तालुक्यातील बामणी 1, देगलूर येथील खाजबाबनगर 1, मुखेड शिवाजीनगर 1, नांदेड विष्णुपुरी जीएमसी 4, छत्रपतीनगर नांदेड 1, जुनामोंढा नांदेड 1, वजिराबाद नांदेड 1, शहिदपुरा नांदेड 1, हिंगोलीनाका 1, जुना कौठा नांदेड 1, वजिराबाद नांदेड 1, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एकाचा समावेश आहे. तर ॲटिजेन तपासणी किटद्वारे गोकुळनगर 4, खालशा कॉलनी 1, साईनगर 1, पाठक गल्ली नांदेड 6, देगलूरनाका नांदेड 1, तरोडा नाका नांदेड 1, गणेशनगर नांदेड 1, लातुरफाटा येथील 1, शिवाजीनगर 2  असे एकुण 51 बाधित व्यक्ती आज आढळले.  
जिल्ह्यात 423 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 88, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 153, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, जिल्हा रुग्णालय येथे 24, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 33, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 17, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 51 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 5 बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
  
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
सर्वेक्षण- 1 लाख 48 हजार 256
घेतलेले स्वॅब- 10 हजार 324,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 498,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 51
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 986,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 5,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 52,
मृत्यू संख्या- 49,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 515,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 423,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 98.  

               प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.  आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सतर्क करणारे आरोग्य सेतू ऍप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 20/07/2020 वेळ 07.00 PM
आत्तापर्यंत एकूण संशयित -9715
एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 8648    • क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 5317
अजून निरीक्षणाखाली असलेले - 503
पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 25
घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 8623
•  आज घेतलेले नमुने - 222
एकुण नमुने तपासणी- 10324
एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 986 (पैकी ०7 संदर्भीत आलेले आहेत)
पैकी निगेटीव्ह - 8498                          
नमुने तपासणी अहवाल बाकी- 98
नाकारण्यात आलेले नमुने -197
अनिर्णित अहवाल – 530
•  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 515
कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 49
जिल्ह्यात  बाहेरून आलेले एकूण प्रवासी 148256 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News