निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा -गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 21, 2020

निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा -गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने




किनवट : कोरोनाच्या प्रादुर्भावात सारं काही ठप्प झालेलं असतांना घरोघर निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्यासाठी दुरदर्शनवरील 'टिली मिली' कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे.
                 कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वत्र हाहाःकार उडाला. सर्व जग ठप्प झालं. सर्व उद्योग, व्यवसाय व ईतर सर्व बाबी थांबल्या. के.जी. ते पि.जी. पर्यंतच्या सर्व शैक्षणिक संकुलास कुलूपबंद व्हावं लागलं. अशाही परिस्थितीत शिक्षण विभागातील सुज्ञांनी व तज्ज्ञांनी " शाळा बंद पण शिक्षण सुरू " ही मोहिम आखून ऑनलाईन शिक्षण देण्यास प्रारंभ केला. अतिदुर्गम, आदिवासी, डोंगरी भागात नेटवर्क पोहचले नाही. तसेच बहुतांशी पालकांकडे ऍन्ड्राईड मोबाईल नाही. यामुळे या पद्धतीला मर्यादा आल्यात. परंतु वाडी - तांडा, पाड्या -गुड्यापर्यंत टी.व्ही. पोहचला आहे. याचा विचार करून दूरदर्शनवर सर्वच वर्गाच्या अभ्यासक्रमाचा  'टिली मिली ' कार्यक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागात वीज गेली असेल  तर मोबाइलवर पुढील लिंक टाकुन हा अभ्यासक्रम पाहता येईल. https://bit.ly/2Qhzvaq
सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाची सविस्तर माहिती वर्गनिहाय वेळापत्रकासह प्रत्येक पालकांपर्यंत पोहचवावी. या निरंतर शिक्षण प्रक्रियेचा लाभ पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांनी केले आहे.

२०जुलै पासून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी *टिली मिली* हा शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यक्रम सुरू होत आहे. ज्यांच्या घरी tv नाही किंवा किंवा दूरदर्शनचे चॅनेल दिसत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना मोबाईलवर हे चॅनेल बघता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोअर वरून *शिक्षक मित्र* हे app इन्स्टॉल करून घ्यावे व ते चालू करून *सह्याद्री वाहिनी* या बटणावर टच करावे. सह्याद्री वाहिनी live बघता येईल. मुलांचा अभ्यास घरच्या घरी होण्यासाठी हे खूप उपयोगी आहे. 
*शिक्षक मित्र* app लिंक- https://play.google.com/store/apps/details?id=shikshakmitra.zen

*असे आहे वेळापत्रक*                                                                                                                                               
👉दिनांक २० जुलै ते २६ सप्टेंबर २०२० या काळातील इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल:           

सकाळी ७.३० ते ८.००- आठवी
सकाळी ८.०० ते ८.३०- सातवी 
सकाळी ८.३० ते ९.००- DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ९.०० ते ९.३०-सहावी
सकाळी ९.३० ते १०.००- पाचवी
सकाळी १०.०० ते १०.३०- चौथी
सकाळी १०.३० ते ११- तिसरी
सकाळी ११.०० ते ११.३०- DD चे अन्य कार्यक्रम
सकाळी ११.३० ते दुपारी १२- दुसरी
दुपारी १२ ते १२.३०- पहिली

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News