टिली मिली कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी पहावा -रविंद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, July 21, 2020

टिली मिली कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांनी पहावा -रविंद्र सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी

       

लोहा : कोविड-१९ मुळे आलेल्या आपत्तीत शाळा बंद, शिक्षण सुरू उपक्रमातून सर्व विद्यार्थ्यांना मोबाईल वर आॕनलाईन शिक्षण घेणे शक्य नसल्यामुळे  टिली मिली हा स्तुत्य कार्यक्रम दूरदर्शनवर नुकताच सुरु केला आहे. त्याचा लाभ लोहा तालुक्यातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थीनीनी  घ्यावा, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के यांनी केले आहे. 
               सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण विविध उपक्रमांद्वारे सुरू राहावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यात शिक्षकांची भूमिका फार मोठी आहे.
               शिक्षकांनी पालकांचे सहकार्य घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दूरदर्शनवरील टिली मिली हा शैक्षणिक कार्यक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, ऑनलाईन शिक्षण इत्यादी उपक्रमांचा लाभ मिळवून देणे ही काळाची गरज आहे. जि. प. कें. प्रा. शा. सुगाव ता. लोहा तालुक्यात लर्निग फ्राॅम होम अंतर्गत शैक्षणिक दिनदर्शिकेचा वापर करून   विद्यार्थी / पालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहेत. 
               नुकताच  टिली मिली हा स्तुत्य कार्यक्रम दूरदर्शनच्या वाहिनींवर सुरू झाला आहे.  या कार्यकमाचे इयत्तानिहाय वेळापत्रक विद्यार्थी/ पालकांपर्य॔त पोहचवावे. या उपयुक्त कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी/ पालकांना प्रोत्साहीत करावे.ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा बंद पडल्यास  https://bit.ly/2Qhzvaq  वर जाऊन भ्रमणध्वनीवरुन हा कार्यक्रम पहाता येतो. शाळा बंद, शिक्षण सुरू.. उपक्रमांतर्गत राबवित असलेल्या विविध उपक्रमांचे  निवडक फोटो, शाळेच्या नावासह या संकुलातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी शैक्षणिक ग्रुपवर पाठवावे असे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी के. के. फटाले, केंद्रप्रमुख टी.पी.पाटील, केंद्रिय मुख्याध्यापक जी .एस. मंगनाळे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News