बारावी बोर्ड परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, July 24, 2020

बारावी बोर्ड परीक्षेत गोदावरी इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजचा १००% निकाल


नांदेड : येथील गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज चा शैक्षणिक वर्ष २०१९-२० बारावी परीक्षेचा निकाल १००% लागला असून याहीवर्षी विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
              
 विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये  देगलूरकर वेदिका शरदचंद्र या विद्यार्थिनीने  विद्यालयातून अनुक्रमे प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर फुलवळकर अनुजा चंद्रकांत या विद्यार्थिनीने द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे. कौरवार स्नेहल गोविंद या विद्यार्थीनीने विद्यालयातून तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. दरवर्षी जुनियर कॉलेजचा निकाल समाधान कारक लागतो या वर्षीही विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांची जागृतता वेळोवेळी घेतलेल्या सराव परीक्षा तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत उज्वल यश संपादन केले.
          
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल खासदार  हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील, तुकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष कीर्ती तगडपल्लेवार, प्राचार्य नितीन हटकर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News