किनवट : माहूर किनवट तालुक्यातील कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी घोषित होऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत कर्ज रक्कम शासनाकडून भरणा करण्यात आलेली असताना देखील शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा सारखणी चे व्यवस्थापक कर्ज देण्यास नकार देत होते.त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील व इतर कृषी कर्ज संबंधी शेतकऱ्यांत संभ्रम अवस्था निर्माण झाली होती.या पार्श्वभूमीवर आ.भीमराव केराम यांनी प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले होते.शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कर्ज प्रकिर्या संदर्भात डॉ.विपिन यांनी गुरुवारी (ता.२३) दिलासादायक निर्देश जारी केले आहे.
माहूर किनवट तालुक्यातील सारखणी स्टेट बँक शाखे सहित इतर बँकांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना आणि इतर पिक कर्ज प्रकरणात अतिशय शुल्लक बाबींसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करून पिक कर्ज लाभापासून वंचित ठेवले जात होते.आमदार भीमराव केराम व दोन्ही तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांनी आज कर्ज प्रकरणासंदर्भात निर्देश जारी केले असून यात एमजेपीएसकेवाय योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे ज्या शाखेत कर्जमाफी आलेली आहे. त्याच बँकेच्या शाखेत त्यांना कर्ज वितरण व्यवस्था करण्यात यावी.जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची समांतर अशी एक व्यवस्था जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्राची मागणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.क्षेत्राच्या दृष्टिकोनातून बँकांना गावे नेमून देण्यात आलेली आहे.कर्ज वाटपाच्या उद्देशाने गाव शहराच्या हद्दीत असलेली शेती असा कयास घेऊन पीक कर्जासाठी रहिवाशी ही अट असणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.काही सातबारावर नोंद असलेल्या फेरफार कम क्रमांकाचे अभिलेख आढळून येत नसल्याने तहसील कार्यालयाच्या फेरफार प्रमाणपत्रा द्वारे कर्ज पुरवठा करण्यात यावा.आणि या सर्वांपेक्षा अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अधिकांश बँका ज्येष्ठ नागरिक शेतकरी व भोगवटादार क्रमांक दोन असलेल्या शेतकऱ्यांना दारावर देखील उभे करत नव्हते तर आज जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात ज्येष्ठ नागरिक शेतकऱ्यांना पिक कर्ज नाकारले जाऊ शकत नाही.तर भोगवटादार वर्ग दोन शेतकऱ्या शेतकऱ्याला कर्ज मर्यादा जास्तीत जास्त एक लाख साठ हजार रुपये इतकी असून महसूल संहिता प्रक्रिया करून अशा शेतकऱ्यांना देखील कर्ज देण्यात यावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिले आहे.एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांचे पिक कर्ज विषयक देण्यात आलेले आदेश शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून माहूर किनवट तालुक्यासह जिल्ह्यातील बँका आता या आदेशाचा अर्थ कसा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल....पूर्ण
◼️आमदार केराम यांच्या पाठपुराव्याला यश...
माहूर किनवट तालुक्यातील विशेषता सारखणी शाखे अंतर्गत येणाऱ्या पिक कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाल्यानंतर देखील बँक नवीन कर्ज देण्यास उत्सुक नव्हते या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी (ता.७) जुलै रोजी प्रांत अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले होते.त्याचेच फलित आज जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणातील सर्व शंका कुशंका ना पूर्णविराम दिले आहे.




No comments:
Post a Comment