जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बदल्या रद्द - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 25, 2020

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बदल्या रद्द



नांदेड ( बालासाहेब लोणे ) : बदल्यांच्या निमित्ताने होणाऱ्या संभाव्य गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व पदाधिकाऱ्यांच्या संमतीने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण  बदल्या रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांनी दिली.
                   शासन पत्रानुसार जिल्हा परिषद मधील गट क व गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार करण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यानूसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आलेले होते .        
                   तथापि नांदेड शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड -१९ या  संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अशा परिस्थीतीत बदल्यांच्या समुपदेशनसाठी जिल्हा परिषद मुख्यालय येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. ही बाब विचारात घेता कोविड -१९ चा प्रादुर्भाव वाढू नये. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सन २०२० च्या सर्वसाधारण बदल्या रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा,उपाध्यक्षा व सर्व सन्मानीय पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून सहमतीने घेतलेला आहे . तेव्हा नियोजित वेळापत्रकानुसार कुणीही जिल्हा परिषद मुख्यालयात येऊन असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

इब्टाने केली होती मागणी

नांदेड जिल्हा परिषदेने कोरोना पार्श्वभूमीवर नांदेड जिप अंतर्गत शिक्षक व जिप कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा)चे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे यांनी नांदेड जिप पदाधिकारी, अधिकारी व संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत लेखी व सभागृहात जाहीर मौखिक भाषण स्वरूपात केली होती. नांदेड जिप प्रशासनाने सुयोग्य दखल घेतल्याबद्दल इब्टाच्या वतीने अभिनंदन करून आभारही मानले आहेत.
   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News