अंधाऱ्या वस्तीत भीमाने लावला दिवा... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 25, 2020

अंधाऱ्या वस्तीत भीमाने लावला दिवा...


 
किनवट : मागील तीन वर्षापासून अंधार झेलणाऱ्या तालुक्यातील आदिवासीबहुल पिंपळगाव ( कि) वासियांची ट्रान्सफॉर्मरची मागणी आमदार भीमराव केराम यांनी वीज वितरण कंपनीकडून पूर्ण केल्याने नागरिकांनी " अंधाऱ्या वस्तीतं भीमाने लावला दिवा... " म्हणत त्यांना धन्यवाद दिले आहेत.
                        शहरापासून नऊ किलो मीटर अंतरावर पिंपळगाव (कि)  आदिवासी बहुल वस्ती आहे. येथे ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्याची मागणी तीन वर्षापासून नागरीक करत होते. ही बाब आमदार भीमराव केराम यांना समजताच त्यांनी तातडीने भोकर येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गोकुलवाड यांचेशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेची तात्काळ अंमलबजावणी करून सहाय्यक कार्यकारी अभियंता राहुल परचाके यांनी ट्रांसफार्मर उपलब्ध करून दिले. कनिष्ठ अभियंता पेनकर यांनी सरपंच अनिल संभा कनाके, आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरसकोल्हे यांच्या उपस्थितीत ट्रांसफार्मर बसविले. त्यामुळे त्या गावातील अंधार नाहीसा झाल्याने, " अंधाऱ्या वस्तीतं भीमाने लावला दिवा... " असे गाणे गुणगुणत नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News