"दैनिक आजचा लोकप्रश्न " च्या नांदेड आवृत्तीच्या किनवट शुभारंभ अंकाचे लोकार्पण - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, July 25, 2020

"दैनिक आजचा लोकप्रश्न " च्या नांदेड आवृत्तीच्या किनवट शुभारंभ अंकाचे लोकार्पण



किनवट : अत्यंत अल्पवधीतच लोकप्रिय झालेल्या "दैनिक आजचा लोकप्रश्न " च्या नांदेड आवृत्तीच्या किनवट शुभारंभ अंकाचे मान्यवरांच्या हस्ते अतिशय दणक्यात व उत्साहात  लोकार्पण करण्यात आले.
          "दैनिक आजचा लोकप्रश्न"चे किनवट तालुका प्रतिनीधी आशिष शेळके यांनी शुक्रवारी (ता. २४ ) दुपारी २ वाजता राजपथ अॅकॅडमी, गोकुंदा येथे लोकार्पण सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात त्यांनी किनवट तालुक्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती, पत्रकार बांधव, इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनीधी, सर्वपक्षीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
          सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेला पुष्पार्पण व वंदन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उत्तम कानिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजूची उद्दिष्टे सांगुन आशिष शेळके यांच्या कामाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर किनवट नगरपरिषदेचे अध्यक्ष आनंद मच्छेवार व वंचित बहुजन आघाडीचे किनवट तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांचे सह उपस्थित मान्यवरांचे हस्ते अंकाचे लोकार्पण करण्यात आले. 
          यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राकाँपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, उपसरपंच शेख सलीम, भाजपा तालुकाध्यक्ष संदिप केंन्द्रे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, नगरसेवक अभय महाजन, शिवा क्यातमवार  ग्रामपंचायत सदस्य उमेश पिल्लेवार, सकाळचे तालुका बातमीदार अॅड. मिलिंद सर्पे, साप्ताहिक वंजारी पुकारचे संपादक दत्ता जायभाये,आज की न्यूजचे संपादक नासीर तगाले, किनवट न्यूजचे संपादक गंगाधर कदम,  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते बालाजी बामणे, आशिष राठोड, सामाजिक कार्यकर्ते विजय वाघमारे, बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस महेंद्र नरवाडे, दया पाटील, जयश्री भरणे, रजिया शेख, संतोष गित्ते, विवेक वाघमारे व राहुल राठोड आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आशिष शेळके यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News