किनवट : महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंद्याचा १२ वी विज्ञान शाखेचा निकाल ९९.३७% व कला शाखेचा निकाल ८७.६२% लागला असून येथील विद्यार्थी पंकज मुरलीधर भवरेने गणितात व कोमल निळकंठ राठोड हिने शिक्षणशास्त्रात १०० पैकी १o० गुण घेतले आहेत.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च२०२०या परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ता.किनवट येथील विज्ञान शाखेचा निकाल ९९.३७ % तर कला शाखेचा ८७.६२ % लागलेला आहे.विज्ञान शाखेत परीक्षेस प्रविष्ट ३१९ विद्यार्थ्यापैकी ३१७ विद्यार्थी तर कला शाखेत परीक्षेस प्रविष्ट २९१ विद्यार्थ्यांपैकी २५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.विज्ञान शाखेतील विशेष प्राविण्य प्राप्त २३, प्रथम श्रेणीत १३२ विद्यार्थी तर कला शाखेतील विशेष प्राविण्य प्राप्त २७, प्रथमश्रेणीत ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी :
१)कु. साक्षी रमेश सराफ -८९.८४%
२)कु. पायल भीमराव राठोड-८५.८४%
३)प्रसाद मोतीराम जाधव-८५.६९%
४)कु.शिवांजली मारोती मुलकेवार-८४.६२
५)कु.शैजल आत्माराम सोनकांबळे-८४.००%
६)कु.गीता पुरुषोत्तम गबाळे-८३.३८%
७)कु.अर्पीता पंढरी कराड-८१.३८%
८)शिरीनबेगम महम्मद जावेद-८०.६१%
९)तेजस लक्ष्मण बोरकर-८०.४६%
कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी-
१)दिक्षांत प्रल्हाद भरणे-९०.७६%
२)कु.शुभांगीशिवाजीराव सुदेवाड-८४.९२%
३)कु. स्वाती आनंद चंदणे-८४.४६%
४)अशोक इंदलसिंग साबळे-८२.००%
५) कु.किर्ती सुधाकर आडे-८१.३८%
६) ओमप्रकाश गोरोबा पहाडे८१.०७%
७)कु. कोमल निळकंठ राठोड-८०.४६%.
मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय गोकुंदाचा निकाल १०० %
येथील मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालयाने मार्च २०२० उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. येथील विज्ञान शाखेचा व कला शाखेचा १०० % निकाल लागला. विज्ञान शाखेत प्रविष्ठ २२ पैकी २२ विद्यार्थी तर कला शाखेतील ३४ पैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय घोटीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० % व कला शाखेचा ८०% निकाल
महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय घोटीचा विज्ञान शाखेचा निकाल १०० % तर कला शाखेचा ८०% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत परीक्षेस प्रविष्ठ २७ पैकी २७ विद्यार्थी व कला शाखेत परीक्षेस प्रविष्ठ १५ पैकी १२विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वरील घवघवीत यशाबद्दल यशस्वींचे संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके, कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगी ठमके, प्राचार्य राजाराम वाघमारे, प्राचार्या स्वाती डवरे, उपप्राचार्य सुभाष राऊत , पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकुर यांच्या सह सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.






No comments:
Post a Comment