हिंगोली : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंर्तर्गत हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रामधील एकूण ३१२ किलोमीटर लांबीचे रस्ते समाविष्ट करण्यात यावेत अशी मागणी करणारा प्रस्ताव खासदार हेमंत पाटील यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे . मतदार संघाच्या विकासासाठी जिल्ह्यांतर्गत व प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांमुळे दळणवळणाची चांगली सुविधा होणार आहे .
मतदार संघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे उद्दिष्ट डोळयांसमोर ठेवून खासदार हेमंत पाटील अविरतपणे कार्य करत असून मतदार संघातील ग्रामीण भागातील सर्व कच्चे रस्ते मजबुती करण करून मुख्य रस्त्यांना जोडण्याच्या उद्देशाने मतदार संघातील सहा विधानसभा निहाय असलेल्या ३१२ किलोमीटरच्या प्रस्तावित रस्त्यांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. हिंगोली मतदार संघात हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांच्या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो.हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग१६१ ते समगा-दुर्गधामणी११कि.मी,देऊळगाव (रामा) -वरुड (गवळी )-बेलेवाडी ते हिंगोली १०कि.मी,इडोळी-अमला-काळकोंडी रस्ता ८.५०कि.मी,आडगाव-बेलुरा-माळहिवरा रस्ता १०.५०कि.मी , कारवाडी-पिंपरखुटा ५ कि.मी असे एकूण ४५ कि.मी.चे रस्ते.सेनगाव तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग २६ ते कौठा रस्ता ३कि.मी, राज्यमार्ग २४८ ते सिनगी-नागा- कारेगाव-शिवणी(खु)-पळशी १०कि.मी, पानकन्हेरगाव-खैरखेडा रस्ता ५.५०कि.मी, आजेगाव-ताकतोडा रस्ता १४ कि.मी,३२ कि.मी ,चे रस्ते .कळमनुरी मधील राज्यमार्ग२५६ ते सिंदगी-जांब- माळधावंडा- बोथी- येडशी-कुंभारवाडी ते राष्ट्रीय महामार्ग१६१ पर्यंत १४कि.मी,प्रमुख जिल्हामार्ग ०७ ते वाई-तरोडा-वाकोडी-ते राज्य मार्ग २५७ पर्यंत रस्ता१२कि.मी ,राष्ट्रीय महामार्ग १६१ ते सांडस- सालेगाव ते राज्यमार्ग २५७पर्यंत रस्ता ७कि.मी,राष्ट्रीय महामार्ग १६१ ते आसोलवाडी-मुंडळ -सोनोडी -मोरगव्हाण रस्ता ९कि. मी,राष्ट्रीय महामार्ग १६१ते दाती-कान्हेगाव-देवजना रस्ता ८ कि.मी असे एकूण ५१ कि.मी चे रस्ते ,तर वसमत तालुक्यामधील प्रमुख जिल्हामार्ग १२ ते पार्डी बु. खाजमापूर गिरगांव ते रेडगाव रस्ता ११.३०कि. मी गिरगाव ते देळुब जिल्हा सरहद्दीपर्यंत ७.कि.मी , राष्ट्रीय महामार्ग १६१ते गणेशपूर- थोरावा- कागबन-सारोळा ते हयातनगर जवळा (बु .)ते जिल्हा सरहद्द (आहेरवाडीकडे )१०कि.मी, राज्यमार्ग २५६ ते कृष्ण मंदिर किनोळा-खुदनापूर -सोमठाणा -पार्डी (बु.) रस्ता ७.कि.मी असे एकूण ३६.५० कि.मी,चे रस्ते,औंढा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ७५२ ते हिवरखेडा-उंडेगाव-चिंचोली-निळोबा-जलालपूर-बेरुळा ५.कि.मी,चिंचोली-निळोबा ते पेरजाबाद रस्ता ५कि.मी , राज्यमार्ग २४९ते जवळा बाजार-आजारसोंडा-तपोवन रस्ता ५कि.मी,प्रमुख जिल्हामार्ग २१ ते ढेगज -वडचुना ते प्रमुख जिल्हामार्ग (२२) ८ कि.मी रस्ता असे एकूण २३.५० कि.मी चे रस्ते आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट ,माहूर आणि हदगाव ,हिमायतनगर तालुक्यातील ६५ कि.मी तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव विधानसभा मतदार संघातील मुडाणा-वडद ८ कि.मी,महागाव-उटी-कोठारी ८.५५ कि.मी,ढाणकी-गांजेगाव-कोपरा २६ कि.मी, टाकळी-तिवडी १६.९०कि.मी, असे एकूण ३१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा समावेश असून खासदार हेमंत पाटील यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित केले आहेत .




No comments:
Post a Comment