लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे क्रांतीची ठिणगी -पोलीस निरीक्षक मारोती थोरात - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 2, 2020

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे क्रांतीची ठिणगी -पोलीस निरीक्षक मारोती थोरात


किनवट  : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे क्रांतीची ठिणगी होती, वंचित,  शोषित समाजासाठी लढणारे ते खरे राष्ट्रभक्त होते, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकवर नसून श्रमिकांच्या व कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे असा संदेश त्यांनी जगाला दिला. असे प्रतिपादन  पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांनी केले.
              लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पोलीस ठाण्यात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले,फकीरा ही त्यांची विद्रोही सुप्रसिद्ध कादंबरी असून या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे वास्तव मांडले आहे. त्यामुळे अण्णाभाऊंचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन तरुण पिढीने राष्ट्र बलशाली करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलतांना केले.
              प्रथमतः पोलीस निरीक्षक मारोती  थोरात यांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी पो.हे.कॉ. पांढरे, पोलीस नायक दिगाम्बर लखुळे,  प्रदीप आत्राम, ग्यानबा लोकरे, राजू पाटोदे  गजानन जाधव, प्रकाश बोदमवाड, परमेश्वर गाडेकर, सुभाष दोनकलवार, पत्रकार मधुकर अन्नेलवार, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष रविकुमार आयनलवार, शंकर भंडारे, लक्ष्मण बोलेनवार, संजय बोलेनवार, बालाजी धोत्रे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News