किनवटमध्ये 6 बाधितांची भर, आजच्या बाधितांत 3 वर्षाची मुलगी व 6 वर्षाच्या मुलाचा समावेश - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Friday, August 7, 2020

किनवटमध्ये 6 बाधितांची भर, आजच्या बाधितांत 3 वर्षाची मुलगी व 6 वर्षाच्या मुलाचा समावेश

 


किनवट : किनवटमध्ये शुक्रवारी (दि. सात) दुपारी दोन वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 3 वर्षाची 1 मुलगी व 6 वर्षाच्या एका मुलाचा समावेश आहे . आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या  48 झाली आहे. कोरोनातून बरे झाल्याने सुटी होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 7 जण आहेत. बाधितांपैकी संदर्भित 3 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 35 असे एकूण 38 रुग्ण उपचार घेत आहेत. 

               शुक्रवारी (दि. सात) दुपारी दोन वाजता आरटीपीसीआर पद्धतीद्वारे केलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस .व्ही.एम. कॉलनीतील 3 वर्षाची 1 मुलगी, 6 वर्षाचा 1 मुलगा, 50 वर्षाची एक महिला, 30 वर्षाची एक महिला व 59 वर्षाचा 1 पुरुष आणि राजगड तांडा येथील 38 वर्षाच्या 1 पुरुषाचा अशा 6 जणांचा अहवाल पॉलिटिव्ह आढळला आहे. 

                डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 15 ( आरटीपीसीआर 8 + रॅपिड 7 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 20 ( आरटीपीसीआर 12 + रॅपिड 8 ) व पूर्वीच संदर्भित 3 अशा एकूण 38 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

दि. 07/08/2020  दुपारी 02.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 263,

निगेटिव्ह स्वॅब- 181,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 6

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

अॅन्टिजन टेस्ट - 0

 निगेटिव्ह अहवाल - 0

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 0


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 6

आज मृत्यू - 0

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 1, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 48, 

रुग्णालयातून सुट्टी दिलेली एकूण संख्या- 7,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 35 + संदर्भित रुग्ण 3     

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News