मुंबई : 'बालगंधर्व साहित्यमंच' या व्हाट्सअप्प समुहात दिनांक ५ ऑगष्ट 2020 रोजी सायंकाळी आठ वाजता भारती सावंत लिखित आणि प्रकाशित 'पुष्पकुंभ चारोळीसंग्रहाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याला बालगंधर्व साहित्यमंचमधील अनिता गुजर, प्रसाद फर्डे, अंगद दराडे, शोभा वागळे, गोपाळ नारायण, सुरेश पवार, कमल भामरे या सर्व साहित्यिकांनी उपस्थिती दाखवून या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्याला विशेष रंगत आणली. या ऑनलाईन सोहळ्याचे सूत्रसंचालन समूहाचे प्रशासक ओमकार मानकामे यांनी केले तर कवयित्री भारती सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.




No comments:
Post a Comment