कोरोनातून बरे झाल्याने आज चौघांना सुटी, किनवटमध्ये 2 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, August 8, 2020

कोरोनातून बरे झाल्याने आज चौघांना सुटी, किनवटमध्ये 2 बाधितांची भर

 


किनवट  : किनवटमध्ये शनिवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट पद्धतीद्वारे केलेल्या तपासणीत 1 व रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 1 असे 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 50 झाली आहे. कोरोनातून बरे झाल्याने आज 4 रुग्णांना सुटी दिली आहे, त्यामुळे बरे होऊन घरी गेलेले आजपर्यंतचे एकूण 11 जण झाले आहेत. बाधितांपैकी आज संदर्भित 2 व येथील कोविड केअर सेंटरमध्ये 32 रुग्ण उपचार घेत आहेत. 

              आज कोरोनातून मुक्त झाल्याने गोकुंदा येथून 1 व किनवट येथून 3 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे .आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या  गंगानगरमधील 49 वर्षाचा 1 पुरुष आणि वेलमापूरा येथील 60 वर्षाचा 1 पुरुष अशा 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. 

                डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 17 ( आरटीपीसीआर 9 + रॅपिड 8 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 15 ( आरटीपीसीआर 7 + रॅपिड 8 )  अशा एकूण 32 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

दि. 08/08/2020  सकाळी 11.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 285,

निगेटिव्ह स्वॅब- 181,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 1

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

अॅन्टिजन टेस्ट - 22

 निगेटिव्ह अहवाल - 21

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 1


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 2

आज मृत्यू - 0

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 1, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 50, 

आज सुटी दिलेले - 4

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 11,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 32 + आज संदर्भित रुग्ण 2    

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News