किनवटमध्ये आज 1 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, August 12, 2020

किनवटमध्ये आज 1 बाधितांची भर

  


किनवट : किनवटमध्ये बुधवारी (दि.12) सायंकाळी 5 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 71 झाली आहे. आजपर्यंत एकूण 34 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 37 रुग्ण उपचार घेत आहेत. 

             आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या वेलमापूऱ्यातील 32 वर्षाच्या 1 पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. 

             

             डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 8 ( आरटीपीसीआर 4 + रॅपिड 4 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 29 ( आरटीपीसीआर 12 + रॅपिड 17 )  अशा एकूण 37 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

दि. 12/08/2020  सायंकाळी 05.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 316,

निगेटिव्ह स्वॅब- 181,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-0

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 0

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट - 32

 निगेटिव्ह अहवाल - 31

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 1


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 1 

आज मृत्यू - 0

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 1, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 71, 

आज सुटी दिलेले - 0

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 34,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-37  

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News