गायक छोटा राजा सिद्धार्थ मुनेश्वर यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान -आयु.महेंद्र नरवाडे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 10, 2020

गायक छोटा राजा सिद्धार्थ मुनेश्वर यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान -आयु.महेंद्र नरवाडे

 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती  ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती  १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत. भाग - १०,
- संपादक


गायक सिद्धार्थ माधवराव मुनेश्वर उपाख्य छोटा राजा यांचा जन्म १०जुन १९७९ रोजी किनवट तालुक्यातील अंबाडी या गावी झाला. त्यांचे शिक्षण एम.ए.,एम.एस.डब्लु.,बी.एड. झाले. नोकरभरती नाही ' त्यामुळे नोकरी नाही. म्हणून काही दिवस विविध गावी बाजारच्या दिवशी बोंबल्या विकायचा व्यवसाय सुरु केला. त्या बाजारच्या भटकंतीतून त्यांना खूप काही अनुभवाने शिकता आलं. आता सध्या किनवटला स्वत: चे किराणा दुकान आहे. छान व्यवसाय करतात. परंतु आवड व समाजाप्रतीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना.


                अनेक गायक कलावंतांचे गुरु असलेले वडील माधवराव,आई रमाबाई व भाऊ रुपेश मुनेश्वर ही गायक मंडळी घरातच असल्याने गायन कलेचे संस्कार सिद्धार्थ मुनेश्वर यांच्यावर झाले. तेच या क्षेत्रातले सुरवातीचे त्यांचे मार्गदर्शक व गुरु झाले. अंबाडी हे त्यांचे गाव तसं प्रबोधनाच्या बाबतीत अग्रेसर  असलेलं गाव.  संत चिमनाजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी बौद्ध मेळावा होतो.  येथे आतापर्यंत अनेक प्रबोधनकार गायक कलावंत येथे आले. त्याचा प्रभाव व प्रबोधन संच घरीच तयार असल्याने गीत सादर करण्यास काही अडचन गेली नाही. नंतर औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयात शिकत असतांना सांस्कृतिक कार्यक्रमात सिद्धार्थ मुनेश्वर भाग घेत असत. स्मृतिशेष प्रा.अविनाश डोळस सरांच्या प्रोत्साहनामुळे चालना मिळाली. वार्षिक स्नेह संमेलन असो की युवक महोत्सव असो त्यात सहभाग असायचा. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन ज्ञानभूमीत शिक्षण झाले. या औरंगाबाद शहरातुन तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.फुले यांच्या विचारांची प्रेरणा त्यांना मिळाली. रमाई, भिमाई, संत कबीर यांच्या विचारांची शिदोरी घेऊन शिक्षण आटोपून गावांकडे आले. मिलिंद महाविद्यालयातुन बाहेर पडलेला विद्यार्थी स्वस्थ कसा बसेल ? सिद्धार्थ मुनेश्वर यांनी २००५ नंतर प्रत्यक्ष गीत गायनाच्या माध्यमातून प्रबोधन करायला सुरुवात केली. उभरता गायक कलावंत सिद्धार्थ मुनेश्वर यांनी स्वत:चा संच तयार करुन स्टेज कार्यक्रम सुरू केले. त्यांच्या उत्कृष्ट, प्रभावी सादरीकरणाची लकब पाहून त्यांना रसिक छोटा राजा संबोधू लागले. ठिकठिकाणी  उत्साही कार्यकर्ते जयंती सोहळे, धम्ममेळावे, धम्मपरिषद आयोजित करत. इतर गायक कलावंतांबरोबर सिद्धार्थ मुनेश्वर यांनाही संधी मिळत गेली.  त्यामुळे खेडोपाडी शहरोशहरी संचासह जाऊन सातत्याने आजही ते प्रबोधन करतात. तबला साथ -सचीन कांबळे, सोनु बर्डे, हार्मोनियम- वडील माधवराव मुनेश्वर, बँजो-विलास रावळे, सुधाकर बनसोडे, अमोल कांबळे, कोरस-सुरेश शेंडे, रुपेश मुनेश्वर भाऊ, रमेश हलवले यांची साथ संगत मिळते.
त्यांचे वाशीम, नांदेड लातूर, वरोरा, वणी, मानोरा, चैनपुर, अंबाडी, उमरी (बाजार ), किनवट, गोकुंदा अशा अनेक ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम झाले. लोककवी वामनदा कर्डक, मनोजराजा गोसावी यांची जास्तीत जास्त गीतं प्रबोधन करतांना ते गातात.

मनपसंत गीते-
१)आकाश मोजतो मी,भीमा तुझ्या मुळे.
२)आपल्याच धडावरती आपले डोके असुद्या.
३)चमच्याच्या मागे लागु नको.
४)भीम तुझा बाप झाला,हो का नाही सांग.
५)पत्रात लिहते रमा.

अशी एकापेक्षा एक सरस गाणी ते प्रभावी शेरोशायरी सह सादर करतात.

संदेश-
अंधश्रद्धा समाजाला दु:खाच्या खाईत लोटतात त्या नाहिशा झाल्या पाहिजेत.बौद्ध धम्म हा माणसाला माणुस बनवणारा  मानवतावादी धम्म आहे आपले जीवन सुखी बनविण्यासाठी बौद्ध धम्माची शिकवण अंगीकारावी व इतरांना ही प्रवृत्त करावे असा संदेश छोटा राजा सिद्धार्थ मुनेश्वर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून देतात.त्यांच्या कार्याला आजुन स्फुर्ती मीळो ही मंगल कामना सह हार्दिक शुभेच्छा!
 
-आयु.महेंद्र नरवाडे
किनवट जि.नांदेड.
मो.न.९४२१७६८६५०.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News