किनवट / माहूर (नांदेड ),दि.९ : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांच्या वतिने रविवारी (दि.९) क्रांतीदिनी विविध मागण्यांसाठी किनवट व माहूर तालुक्यातील अनेक गावात आंदोलन करण्यात आल्याचे 'माकप',च्या राज्य समितीचे सदस्य अर्जुन आडे यांनी सांगितले.
उत्पन्न कर न देणाऱ्या सर्व जनतेला दरमहा १० हजार ५०० रुपये पुढील सहा महिने द्या, माणसी १० किलो मोफत धान्य उपलब्ध करून घ्या, मनरेगा योजनेतून दोनशे दिवस काम व सहाशे रुपये मजुरी ग्रामीण व शहरी श्रमिकांना द्या, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा, परदेशी व देशी मक्तेदारांना सवलती बंद करा, शेतमजूरांना मागेल त्या गावात रोजगार हमीचे कामे उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफ करून तात्काळ कर्ज वाटप करा, या व इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
किनवट तालुक्यात तोटंबा, मांनसींग नाईक तांडा, दिपला नाईक तांडा, चंद्रु नाईक तांडा, मार्लागोंडा, चिखली, कंचली, अप्पारापॆठ, दुर्गानगर, रीठ्ठा, नंदगाव, नंदगाव तांडा, परोटी , बुरकुलवाडी, पांगरी ,हुडी, कुपटी सोनवाडी, लोखंडवाडी, कनकी,नागापुर, लोणी, तल्हारी आदि गावात हे आंदोलन झाले.आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन संबंधित ग्रामसेवक,तलाठी यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व मा.क.पा चे नेते काॅ.अर्जुन आडे ,जनार्दन काळे,काॅ.स्टॅलिन आडे शेतकरी नेते खंडेराव कानडे, काॅ.आनंद लव्हाळे, प्रकाश बोड्डेवार, लक्ष्मण राठोड, काॅ.गोविंद चव्हाण, काॅ.विजय जाधव, काॅ.मोहन जाधव ,काॅ.तानाजी राठोड, काॅ.मनोज सल्लागार, काॅ.प्रशांत जाधव, शिवाजी किरवले, देविदास खोकले , काॅ.खिरु आडे , काॅ.टिकाराम राठोड , काॅ.प्रकाश आडे, देविदास राठोड, अजय राठोड आदिंनी केले.
" ९ ऑगस्ट क्रांतिदिनी" मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने माहुर तालुक्यातील अनेक गावात निदर्शने आंदोलन
माहूर : ९ ऑगस्ट क्रांतिदिन व जागतीक आदिवासी दिनी जनतेच्या विविध प्रश्नावरती माहुर तालुक्यातील अनेक गावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने निदर्शने करीत केंद्रातीला भाजप च्या मोदी सरकार कडून लॉकडाउन काळात मोठ्या प्रमाणावर लोकशाहीला नाकारून संविधान विरोधी, जनविरोधी निर्णय, धोरणे व कायदे केल्या जात असल्यामुळे देशातील कष्टकरी जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यवसाय करणारा देशोधडीला लागला आहे. देशात कधी नव्हती एवढी बेरोजगारी वाढली असताना कोरोनाच्या नावाखाली संसदेला, विरोधी पक्षांना किंवा जनतेला विश्वासात न घेता जनतेनी संघर्षातून मिळवून घेतलेले अधिकार संपुष्टात आणल्या जात असुन सार्वजनीक क्षेत्रांतील कंपनी, रेल्वे विमानतळ, बॅक सह आदी विक्री करण्याचा एक कलमी कार्यक्रम चालवला आहे तो थांबला पाहिजे या करिता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या संयुक्त विद्यमाने ९ ऑगस्ट क्रांतिदिनी मोदी सरकारला होश मध्ये आणण्यासाठी खालील मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले आहे.
💥शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करा, 💥राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या,💥घरगुती व कृषिपंपाची वीज बिल माफ करा, २०२० चे वीज विधेयक रद्द करा,💥युरिया ची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या.💥 प्रत्येक कुटूंबाला दरमहा १० किलो धान्य, १ ली तेल, १ किलो डाळ, १ किलो साखर देण्यात यावे, 💥 लॉकडाउन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, 💥आदिवासी जनतेला मिळणारी खावटी ताबडतोब द्या, 💥केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षण पद्ध्ती रद्द करा आदि मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहे.
ह्या आंदोलनात जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले आहे. यावेळी कॉम्रेड शंकर सिडाम काॅ. किशोर पवार, काॅ्.प्रल्हाद चव्हाण, तालुका सचिव काॅ. राजकुमार पडलवार, काॅ. डाॅ. बाबा डाखोरे, काॅ संजय मानकर , राजु राठोड, रवि भगत , कैलास भरणे, गांगजी मेश्राम, अमोल आडे, चंद्रभान निलेवाड, वसंत राठोड, परसराम पारडे, अंबादास आडे, संतोष गोलमवार, विष्णू आडे , संदिप जाधव , रायसिग राठोड, सतराम पवार , शंकर चव्हाण, आत्माराम पवार ,रवि राठोड ,प्रल्हाद जाधव, दशरथ जाधव ,भावसिग राठोड, दत्ता महाराज निलेवाड, शाम जाधव ,देवसिंग राठोड ,देवीदास पवार ,रोहिदास पवार ,निलेश जाधव ,उमेश जाधव ,प्रकाश राठोड ,प्रकाश चव्हाण ,विनोद डाखोरे ,पवण राठोड आदींचा सहभाग होता.











No comments:
Post a Comment