किनवटमध्ये आज 2 बाधितांची भर, बरे झाल्याने 10 व्यक्तींना सुटी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 11, 2020

किनवटमध्ये आज 2 बाधितांची भर, बरे झाल्याने 10 व्यक्तींना सुटी

 


किनवट  : किनवटमध्ये मंगळवारी (दि. 11) सायंकाळी 6 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 2 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 70 झाली आहे. कोरोनातून बरे झाल्याने आज 10 जणांना रुग्णालयातून घरी पाठविले. आजपर्यंत एकूण 34 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 35 रुग्ण उपचार घेत आहेत. 

             आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या वेलमापूऱ्यातील 60 व 30 वर्षाच्या 2 पुरुषांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. 

             त्यामुळे उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी वेलमापूरा व दि. 10 रोजी सायंकाळी 1 बाधित आढळलेल्या बेल्लोरी (कि ) या भागाला कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. यासह शहरातील एस. व्ही. एम. कॉलनी, मोमीनपूरा, इस्लामपूरा, राजेंद्रनगर, सराफालाईन व तालुक्यातील तल्लारी, राजगड तांडा, लोणी, कोल्हारी,शिवणी व  वस्ताद लहुजी साळवेनगर, कोठारी ( चि) या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत किनगे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.

             डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 6 ( आरटीपीसीआर 3 + रॅपिड 3 ), कोविड केअर सेंटर, किनवट येथे 29 ( आरटीपीसीआर 12 + रॅपिड 17 )  अशा एकूण 35 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

दि. 11/08/2020  सायंकाळी 06.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 315,

निगेटिव्ह स्वॅब- 181,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-0

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 0

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

अॅन्टिजन टेस्ट -14

 निगेटिव्ह अहवाल -12

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 2


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 2

आज मृत्यू - 0

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 1, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 70, 

आज सुटी दिलेले - 10

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 34,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-35

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News