हिंगोली : हिंगोलीत हळद संशोधन केंद्रास मंजुरी देण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दर्शविल्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक आशेचा किरण निर्माण केला आहे. हिंगोलीतील रेल्वेच्या मोकळ्या जागेत केंद्र सरकारच्या अन्नपुरवठा विभागाकडून ५0 लाख मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधण्याची मागणी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केल्यानंतर या विषयात मागील महिन्यात झालेल्या सचिव स्तरावरील बैठकीनंतर मंजुरी देण्यात आली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात हिंगोलीत ओस पडलेल्या या जागेत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्याचा साठा करण्यासाठी मोठे गोदाम उपलब्ध करण्याची मागणी केली होती. त्यावर रामविलास पासवान यांनी मागील महिन्यातील १८ जून २०२० रोजी व्हीडीओ कॉन्फर्सद्वारे वाणिज्य मंत्रालयाचे सहसचिव ! अनंत स्वरुप, रेल्वेमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. रविकांत गुप्ता, रेल्वे भुविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष वेदप्रकाश डुडेजा, रेल्वेमंत्रालयांच्या संयुक्त कंपनीचे कार्यकारी संचालक अजय शर्मा, मालमत्ता विभागाचे कार्यकारी संचालक ए. के. सिन्हा, अन्न महामंडळाचे कार्यकारी संचालक रविंद्र अग्रवाल तसेच सरव्यवस्थापक रजत शर्मा या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत खा.हेमंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्या हिंगोली येथेरेल्वेच्या मोकळ्या जागेवर धान्यासाठी गोदाम उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
खासदार पाटील हे केंद्र सरकारच्या वाणिज्य समितीचे सदस्य आहेत. हिंगोली येते हळद संशोधन केंद्र स्थापन करण्याच्या त्यांनी केलेल्या मागणीला राज्य शासनाने दिली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल व अन्नधान्याला न्याय मिळवून देण्यासाठी खा. पाटोल यांचा केंद्र आणि राज्यसरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. हिंगोली येथील रेल्वेच्या मोकळ्या जागेची चाचपणी वखार महामंडळाने केली असून या ठिकाणी लवकरच ५0 टन साठवणूक क्षमतेचे गोदाम उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हिंगोलीसह नांदेड, वाशिम, परभणी व यवतमाळ जिल्ह्याला या गोदामाचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे मार्गांनी येणारे खत, बियाणे, सिमेंट किंवा पाठवला जाणारा कच्चा माल साठविण्यासाठी हे गोदाम उपयोगी पडणार आहे. नांदेड विभागीय रेल्वेच्या कार्यक्षेत्रात असे एकही गोदाम आतापर्यंत नसल्याने गैरसोय होत होती. परंतु खासदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हिंगोलीत ते उपलब्ध होत आहे.




No comments:
Post a Comment