130 व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी 162 बाधितांची भर ▪️गत पाच दिवसात सहा जणाचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 11, 2020

130 व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी 162 बाधितांची भर ▪️गत पाच दिवसात सहा जणाचा मृत्यू

 


 

नांदेड (जिमाका) दि. 11 :-  मंगळवार 11  ऑगस्ट रोजी सायं. 6  वाजेपर्यंतच्या अहवालानुसार जिल्ह्यात 130 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 162 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 118 बाधित आले.

आजच्या एकुण 1 हजार 516 अहवालापैकी  1 हजार 322 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 518 एवढी झाली असून यातील 1 हजार 909 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 115 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

6  ऑगस्ट रोजी  उमरी तालुक्यातील काबलगुडा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, 9 ऑगस्ट रोजी करडखेड ता. देगलूर येथील 70 वर्षाची एक महिला , 10 ऑगस्ट रोजी दिपनगर तरोडा नाका येथील 76 वर्षाचा एक पुरुष, खुसरोनगर नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष व 11 ऑगस्ट  रोजी हिमायतनगर येथील 65 वर्षाचा एक पुरुष यांचा शासकीय  वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर किल्ला रोड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 126 एवढी झाली आहे.     

 

आज बरे झालेल्या 130 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 3, नायगाव कोविड केअर सेंटर येथील  8, देगलूर कोविड केअर सेंटर 21, कंधार कोविड केअर सेंटर 6, बिलोली कोविड केअर सेंटर 2, अर्धापुर कोविड केअर सेंटर 4, हदगाव कोविड केअर सेंटर 1, मुखेड कोविड केअर सेंटर 2,  पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 50, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 24, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2, किनवट कोविड केअर सेंटर 7 असे एकूण 130 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 6, लोहा तालुक्यात 3, मुदखेड  तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 5, कंधार तालुक्यात 1, माहूर तालुक्यात 2, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 2, देगलूर तालुक्यात 6, हिमायतनगर तालुक्यात 1, हदगाव तालुक्यात 1, धर्माबाद तालुक्यात 13, यवतमाळ जिल्ह्यात 1  असे एकुण 44 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 46, भोकर 1, मुदखेड तालुक्यात 5, धर्माबाद तालुक्यात 5, बिलोली तालुक्यात 10, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 36,  नायगाव 5, किनवट 5 असे एकूण 118 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 465 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 218, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 535, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 37, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 53, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 31, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 113, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 110, लोहा कोविड केअर सेंटर येथे 3, हदगाव कोविड केअर सेंटर 49, भोकर कोविड केअर सेंटर 18,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 23, किनवट कोविड केअर सेंटर येथे 35, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 30, मुदखेड कोविड केअर सेटर 10, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 18, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 35, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 122 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 

▪️जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 61,

घेतलेले स्वॅब- 22 हजार 850,

निगेटिव्ह स्वॅब- 17 हजार 552,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 162,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 518,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 25,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 25,

मृत्यू संख्या- 126,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 909,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 465,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 297, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 115.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ऍप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News