किनवट ( ऍड. विलास सूर्यवंशी) :दिव्यांग लाभार्थी निधी वाटपात मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ग्रामसेवकावर फौजदारी प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटना सचिव राज माहुरकर व शहराध्यक्ष सलाम बागवान यांनी दिनांक 14 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे लेखी निवेदन गटविकास अधिकारी यांना 28/07/2020 रोजी दिले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने आज दिनांक 14 /08 2020 रोजी पासून उपोषण सुरू करण्यात आले व सदर उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहणार असे संघटनेचे सचिव राज माहुरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले.
सन 2016 पासून दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून ग्राम पंचायत स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्यासंबंधाने शासनाद्वारे किनवट पंचायत समितीअंतर्गत संघटनेच्या लाभार्थ्यांची थकीत चालू वर्षाचे सण 16 सोळा ते 20 वीस पर्यंत 3 टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामपंचायत स्तरावरून लाभार्थ्यांना निधी वाटप करण्यात आला असून तालुक्यात आजपर्यंत वाटप न झालेल्या ग्रामपंचायती आहेत . त्याच अनुषंगाने मौजे घोटी ग्रामपंचायतीअंतर्गत लाभार्थ्यांना 16 ते 19 पर्यंत ठेवून फक्त 2019 ते 2020 मध्ये दाखवून त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे 24/ 7 /2020 रोजी साध्या व्हाऊचरवर रक्कम अदा करण्यात आली असे माहिती अधिकारात मागण्यात आलेल्या माहितीमध्ये स्पष्ट दिसत आहे. गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे दिनांक 11/ 5/ 2020 रोजी गोकुंदा येथील दिव्यांग लाभार्थी यांच्यावतीने माहिती अधिकार देण्यात आल्या वरून पंचायत समितीने जन माहिती अधिकारी यांच्याकडून सदर माहिती अर्जावर दिनांक 8/6/2020 पत्र क्रमांक 1442 नुसार पत्रासोबत एकूण 31 पाने पुरविण्यात आले असून त्यात एक प्रत माननिय उपमुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) जिल्हा परिषद नांदेड माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीचे जन माहिती अधिकारी पंचायत समितीचे जन माहिती अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीचे अवलोकन केले असता जन माहिती अधिकारी यांनी 19 ते 2020 मध्ये प्रति लाभार्थी दाखविण्यात आले आहेत. तसेच पंचायत समिती ग्रामपंचायत याच्यातील टप्पावरती 44 हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट शहर अध्यक्ष सलाम बागवान व तालुका सचिव राज माहुरकर यांनी लेखी तक्रार गटविकास अधिकारी किनवट यांच्याकडे केली असून 14 ऑगस्टच्या आत संबंधित ग्रामसेवकावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे म्हणून पंचायत समिती किनवट समोर 14 ऑगस्ट पासून उपोषणास बसले असल्याचे सांगण्यात आले आहे. 28/07/2020 रोजीच्या निवेदनाच्या प्रती उपविभागीय विभागीय अधिकारी किनवट, तहसीलदार किनवट व पोलीस स्टेशन किनवट यांना देण्यात होते. आज रोजीच्या उपोषणामध्ये अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट शहर अध्यक्ष सलाम बागवान व तालुका सचिव राज माहुरकर ,राजेंद्र मेश्राम घोटी (नवाखेडा) , गजानन कोतापेल्लीवार (कोठारी) यांच्यासह अनेक संघटनेचे अनेक सदस्य आपल्या संविधानिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी लोकशाही पद्धतीने उपोषण करत आहेत .छत्रपतींच्या स्वराज्याचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रामध्ये विकलांगाच्या निधीतही भ्रष्टाचार होतो . अजून दुर्दैवाची गोष्ट कोणती ? असू शकत नाही. भ्रष्टाचारामुळे पीडित सदस्यांना न्याय मिळतो का ? किंवा कसे ? हे जोपर्यंत वैधानिक एजन्सीकडे तपास जाणार नाही तोपर्यंत सत्य बाहेर येणार नाही म्हणजेच सत्याची उकल होणार नाही. वैधानिक एजन्सी म्हणजे पोलिस एजन्सी होय जोपर्यंत पोलिसाकडे अशा भ्रष्टाचाराची तक्रार जात नाही तोपर्यंत पोलिसी एजन्सी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलू शकत नाहीत हे सत्य जरी असले तरी ज्या कार्यालयाच्या अखत्यारीत भ्रष्टाचार झाला त्या कार्यालयाचा कार्यालय प्रमुख असेल त्या प्रमुखाला भ्रष्टाचार हा झाला किंवा कसे याची माहिती मिळवायची असल्यास किंवा प्रथम दर्शनी भ्रष्टाचार निदर्शनास येत असल्यास संबंधित कार्यालय प्रमुख प्रत्यक्षरित्या तक्रार देऊन पोलीस एजन्सीमार्फत चौकशी करून म्हणजे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून पीडित व्यक्तींना न्यायप्रदान करण्याचा प्रयत्न करू शकतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणूनच की काय सदर संघटना प्रतिनिधींनी लोकशाही मार्गाने त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.




No comments:
Post a Comment