सामाजिक कार्यकर्त्या माई अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांचे निधन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 17, 2020

सामाजिक कार्यकर्त्या माई अंजनाबाई हरिहरराव सोनुले यांचे निधन

 




हदगाव (नांदेड ) : राष्ट्रनिर्माते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे नांदेड जिल्ह्याचे प्रथम खासदार स्मृतिशेष हरिहरराव नागोराव सोनुले यांच्या सुविद्यपत्नी तथा हदगाव नगरपरिषदेच्या माजी अध्यक्षा अंजनाबाई हरिहरराव सोनुले ( वय 85 वर्षे ) यांचे सोमवारी ( दि.17) सकाळी 7.00 च्या सुमारास  निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हदगाव येथे सोमवारी (दि.17 ) दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

              डॉ. बाबासाहेबांच्या हयातीत निस्सीम काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या फळीतील बिन्नीचे कार्यकर्ते हरिहरराव सोनुले यांच्या सहचारिणी असलेल्या अंजनाबाई यांनी आपले पती डॉ. बाबासाहेबांनी स्थापलेल्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे नांदेडचे पहिले खासदार झालेत, तेव्हा पासूनच सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या प्रेमानं सांभाळलं म्हणूनच त्यांना सर्वजन माई म्हणत. अनेकांच्या सुख- दुःखात त्या धाऊन जात. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आला. हदगाव तालुक्याची ज्ञानवाहिणी असलेल्या पंचशिल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आदर्श विद्यार्जन मंडळ, हदगाव या शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका होत्या. 

              हदगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष तथा आदर्श विद्यार्जन मंडळ, हदगाव  शिक्षण संस्थेचे सचिव सुनील हरिहरराव सोनुले यांच्या त्या मातोश्री होत. 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News