अभिष्टचिंतन : यह भी दिन चेले जायेंगे -मारोती सुंकलवाड - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 17, 2020

अभिष्टचिंतन : यह भी दिन चेले जायेंगे -मारोती सुंकलवाड

 


 मा.आमदार भीमराव केराम यांचा वाढदिवस, त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा... वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या विषयी मित्र या नात्यांनी अभिष्टचिंतनपर व्यक्त व्हावसं वाटलं, म्हणून लिहिता झालो. लेखाचं शिर्षक अशा शुभप्रसंगी अशुभ वाटत असेल. कारण केराम साहेबांना "बडे दिनो के बाद" अच्छे दिन आलेले आहेत. त्यांच्या एका जीवलगानं दिन चेले जायेंगे म्हणावं; जिव्हारी लागणं साहजिक आहे. परंतु आजवर मी खोटं कधीच लिहिलं नाही. "वस्तुनिष्ठ लिहितांना कोणाची भिडमुरवरत ठेवायची नसते, हे मला केराम साहेबांनीच शिकवलं...
यह भी दिन चेले जाएंगे हे वाक्य सम्राट अकबरानी आपल्या दरबारातील आसनाच्या मागील भिंतीवर ठळक अक्षरात लिहून ठेवलं होत. दरबारात येणाऱ्या दुखी माणसास आपलं दुःख सरलं%%%  सुख येईल%%% आणि सुखी माणसास वाटे की, हे बदलणारं आहे. जरा जपके रहेना.
मी स्वतः पंचवीस वर्षांपूर्वी केराम साहेबांच्या बैठकीतील त्यांचे आसनाचे मागील भिंतीवर यह भी दिन चेले जायेंगे आणि बैठकीत प्रथम दर्शनी भागावर मी ज्यांचे विरुद्ध लढतो ती माणसं माझीच असतात. अशी दोन वाक्ये लिहिली होती. ती अशा गर्भित अर्थानेच. त्यामुळेच या लेखाचं शीर्षक असं घेतलं इतकच. चिखली या गावी गोंड या आत्यंतिक गरीब आदिवासी कुटूंबात 15 ऑगस्ट 1966 रोजी त्यांचा जन्म झाला. पाटोद्याच्या आश्रम शाळेत शिकत असताना वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पोटभर जेवण मिळत नाही. ते मिळाले पाहिजे यासाठी केराम साहेबानी विद्यार्थी आंदोलन छेडले. असा भाकरीचा अर्धचंद्र शोधणारा कोने एकेकाळीचा उपासपोटी माणूस आमदार व्हावा, हे आजच्या महागड्या निवडणुकीच्या गढूळ राजकीय वातावरणात चमत्कारिक वाटते. परंतु चिरेबंद आत्मविश्वास, आर या पार करण्याची जिद्द कठोर मनोनिग्रह हे लढवय्या योद्ध्याला युद्ध भूमीवरून कसे तसूभरही मागे हटूच देत नाहीत. अशा धैर्यशाली योद्ध्याला विजयश्री हातात माळ घेऊन स्वागतासाठी ताटकळत उभीच असते. यातही केराम साहेबांच्या वाट्याला पूर्वी आलेलं दुर्दैव; असं की मागील सतत पाच निवडणुकीत आमदारकीच्या खुर्चीनं त्यांना हुलकावण्या दिल्यात. अगदीच थोड्या-थोड्या मतांनी ते पराभूत होत राहिलेत. मात्र तो पराभव देखील विजया इतकाच प्रभावी राहत असे... आत्ताच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत मात्र पराभवानं नांगी टाकली. विजयश्रीनं केराम साहेबांना सद्गतीत होऊन मोठ्या हर्षोल्लासानं गळ्यात हार घालून आलिंगन दिलं....
     आता गंमत अशी की, युद्ध झाल्यानंतर, शिकार केल्यानंतर आणि निवडणूक व्हायच्या आधी माणसं सर्वाधिक खोटं बोलतात. हे चिरंतन आणि सर्व पक्षीय सत्य आहे. असं सर्वार्थाने समर्थ अशा जर्मनीचा पहिला चान्सलर बिस्मार्क यांनी म्हटलं होतं. केराम साहेबांना विजय मिळवून देण्यात जीवाचं रान केलेल्या कार्यकर्ते सैनिकांना बिस्मार्कचं हे वाक्य डिवचत आहे.
     किनवट-माहूर विधानसभा क्षेत्राचा केराम साहेबांना सखोल अभ्यास आहे. किंबहुना मतदार संघातील प्रश्न आणि समस्यांची त्यांच्या इतकी इत्यंभूत माहिती असणारा आजघडीस दुसरा नेता नाही. असे म्हटले तर, वावगे ठरू नये. त्याच्या सोडवणुकीचे कसबही त्यांच्यात आहेत. कारण केराम साहेबांची प्रशासनावर मांड पक्की आहे.
     तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष, रखडलेली रस्त्याची कामं, चालूच न झालेली पण आशिया खंडातील आदिवासी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकमेव "रेणुकादेवी आदिवासी सूतगिरणी, असो की, प्रस्तावित उनकेश्वर येथील उनकदेव साखर कारखाना असो, ही शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर ताठ मानेनं उभं करणारे हे प्रकल्प कार्यान्वित होणं गरजेचं आहे. तसं करता आलं तर त्यांना 25 वर्षे मागे फिरून पाहण्याची गरजच पडणार नाही. केराम साहेबांना  हे काही अशक्य  नाही. कारण केंद्रात त्यांचं भाजप पक्षाचं एकहाती सरकार आहे. राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार जरी नसलं तरी, शेतकरी हिताचं उद्धव साहेब ठाकरे यांचं सरकार आहे. दुधात साखर अशी की, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील आहेत. दोघातील संबंधही घटमैत्रीचे आहेत. शिवाय हेमंत पाटील विकासात पक्षीय राजकारणाला आडवं येऊ देत नसतात, त्या बरोबरच राज्यातील डझनभर मंत्री हे केराम साहेबांनी पक्षाच्या पुढे जाऊन जपलेले त्यांचे मित्र आहेत. हे मी खूप जवळून पाहिलेलं आहे. किनवट-माहूर हा अतिदुर्गम, नक्षलप्रवण, आदिवासी बहुल आणि वंचित तालुका असल्यामुळे सर्वपक्षीय नेतेमंडळींना विकासाबाबत खूप कळकळ आहे.
राहिला प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांचा, केराम साहेबाच्या अवतींभोवती आज जे कार्यकर्त्यांचा कोंडाळा आहे, त्याबद्दल जुन्या कार्यकर्ता मंडळीत खदखद आहे आणि ते असणे साहजिक आहे. पंचवीस वर्ष ज्यांनी खसता खाल्ल्यात, हाल सोसलेत ते दुरावत चालल्याचं चित्र नक्कीच वेदनादायी आहे. केराम साहेबांनी जेवढे पक्ष बदलले त्या-त्या वेळी, गायीमागे वासरू जावं, तसं मांडवाखालून त्यांचे कार्यकर्ते ही फिरून आलेत, पण त्यांनी साहेबांना कधीही सोडलेलं नाही. त्यांच्या कांही अपेक्षा असणं गैर नाही. कारण त्यांनी भोगलं,  सोसलं पण साहेबांची साथ सोडली नाही.
     याबद्दल बोलायला कार्यकर्ते घाबरतात, पण अशा सुवर्णक्षणी कोणी तरी डायरेक्ट बोललं पाहिजे म्हणून मी लिहिलं, कारण "यह भी दिन चेले जायेंगे. गुळाच्या ढेपीला मुंगळे चिटकत असतातच हे स्वाभाविकच आहे. केराम साहेबांना सल्ला देण्याइतके आम्ही शहाणे नसलो तरी, त्यांच्या जीवाचा जिवलग मित्र आणि पंचवीस वर्षाचा सिनिअर सोबती व समदुःखी आहे. माझा पक्ष वेगळा असला म्हणून काय झालं? जुने कार्यकर्ते मला टोचत राहतात. पण लोकांना वाटते तसं मुळीच नाही. गाडी रुळावर यायला थोडावेळ लागतच असतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही ज्यांची शक्तीस्थळं आहेत, ज्यांचा पिंड पुरोगामी विचारांच्या बैठकीत तयार झाला, ज्यांना अशा महामानवांच्या बैठकीचे केराम साहेबांना अधिष्ठान लाभलेले आहे. पीडित, शोषित, वंचित माणसाच्या काहीतरी वाट्याला आलं पाहिजे. ते मिळवून देण्यासाठी त्यांनी अख्खी हयात तारण ठेवलेली आहे अशा कसदार नेत्याला दुसऱ्या कोणी सांगणे ना लगे.
     मागणारे हजारो हात पुढे सरसावतात, पण देणाऱ्याला तर दोनच हात असतात ना, काळजी करण्याचं कारण नाही. सबको मौका आता है. यह भी दिन चेले जायेंगे. बस्स...
जनसामान्यांचा तारणहार मा.आमदार भीमराव केराम यांना  उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो  हीच प्रार्थना.
छोडेंगे ना हम तेरा साथ, ओ साथी मरते दम तक... हेच अभिष्टचिंतन!
जय महाराष्ट्र

-मारोती सुंकलवाड,
ज्येष्ठ शिवसैनिक 
मो.9767033060    


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News