पोळा... ( कविता)
-प्रदीप मनोहर पाटील
सण आला पोळा
देव होतात गोळा
चला सजवू बैलाला
मूक प्राणी भोळा....
विश्रांती देऊ त्याला
सदैव राबतो शेताला
साथ त्याची शेतकऱ्याला
मान देतोय पोळ्याला....
देतोय साथ सोबत
मिळतो आराम मला
राबणं तुझंच संगतीला
कळा तूझ्या मानेला....
उन्ह पाऊसात राबतो
औत ताकतीनं ओढतो
माती सोबत जुळतो
तरी चौखूर पळतो....
खरा मित्र शेतकऱ्याचा
भार हलका मालकाचा
ऋणी तोही बैलाचा
मान सण पूजेचा....
-प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव
मोबाईल. 9922239055©️®️
बैलपोळा....
व्रत पशु सेवेचं
आलोय तूझ्या सेवेला !!धृ !!
आजोबा पणजोबा पूर्वजांनी
बांधलंय तुला दावणीला
तीच परम्परा सुरु
तूच आहेस संगतीला...
राब राब राबतोस
कष्ट आपल्या पाचवीला
जुंपतो शेतात औताला
बांधावरचं गवत तुला....
ऊन पावसात कामाला
दुशेर तूझ्या मानेला
जुंपतो पेरणी तिफनाला
माफ कर शेतकऱ्याला ....
मूक सुख दुःख सोबतीला
धुवून रंगवून सजवला
खाऊ घालतोय पुरणपोळी
पुजतो या सणाला....
जिणं सृष्टी संग
राबुन मातीत थकला
लावतो ट्रॅक्टर हार्वेस्टर
देतोय विश्रांती तुला....
-प्रदीप मनोहर पाटील'
गणपूर ता. चोपडा, जिल्हा जळगाव
मो. 9922239055©️®️




No comments:
Post a Comment