बैलपोळा (कविता)
-भारती सावंत,मुंबई
सण हा सुखसोहळ्याचा
बैलपोळा साजरा करण्या
गोठ्यातील साऱ्या बैलांना
आणू न्हाऊमाखू घालण्या
मखमाली झूली अंगावरती
रंगवू त्यांची डौलदार शिंगे
कपाळाला सोनेरी वर्खाची
बांधूया चमकदार बाशिंगे
सजवून ढवळ्यापवळ्यांची
गावभर मिरवणूक काढूया
तुपातील कणकीचे रोटही
खाण्या मुखी त्या घालूया
पुरणपोळीचा दाखवू नैवेद्य
नाहीच लावायचे कामधाम
दिवसभर सजवून मिरवूया
बेंदूरसणाचा त्यांना आराम
मूके जनावर आहे बळीचे
राबते आयुष्यभर दिनरात
आळस नसे मुक्या जीवां
खपती बळीच्या शिवारात
-भारती सावंत,
मुंबई
9653445835




No comments:
Post a Comment