84 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 138 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 18, 2020

84 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 138 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू

 


नांदेड (जिमाका) दि. 18 :- मंगळवार18 ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 84 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 138 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 46 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 92 बाधित आले.

 

आजच्या एकुण 802 अहवालापैकी  627 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 4 हजार 325 एवढी झाली असून यातील 2 हजार 561 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 580 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 182 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

 

सोमवार17 ऑगस्ट रोजी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील 55 वर्षाच्या एका पुरुषाचाशासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्य झाला.

            सोमवार18 ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील नवघरवाडी येथील 68 वर्षाचा एक पुरुष नांदेड तालुक्यातील सुगाव खुर्द येथील 65 वर्षाचा एक पुरुष , नायगाव तालुक्यातील कहाळा येथील 65 एक पुरुषाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 153 एवढी झाली आहे.  

  

आज बरे झालेल्या 84 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 6, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 8,  हदगाव कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड सेंटर 2किनवट कोविड सेंटर 3 हिमायतनगर कोविड सेंटर 1मुदखेड कोविड सेंटर 1मुखेड कोविड सेंटर 2 पंजाब भवन कोविड सेंटर 14देगलूर कोविड केअर सेंटर 30धर्माबाद कोविड सेंटर 5 एकूण 84 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 13, अर्धापूर तालुक्यात 1देगलूर तालुक्यात 2मुखेड तालुक्यात 17माहूर तालुक्यात 1धर्माबाद तालुक्यात 1 यवतमाळ 1लातूर 1नांदेड ग्रामीण 1भोकर तालुक्यात 2कंधार तालुक्यात 4नायगाव  तालुक्यात 3किनवट तालुक्यात 1परभणी 1हिंगोली 4 असे एकुण 46 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 24, हदगाव तालुक्यात 6मुखेड तालुक्यात 30नायगाव तालुक्यात 5किनवट तालुक्यात 1बिलोली तालुक्यात 2आदिलाबाद 1 भोकर तालुक्यात 2कंधार तालुक्यात 3उमरी तालुक्यात 17धर्माबाद तालुक्यात6परभणी 1हिंगोली 1 असे एकुण 92 बाधित आढळले.

 

जिल्ह्यात 1 हजार 580 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 196, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 684, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 41, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 33, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 111,  देगलूर कोविड केअर सेंटर येथे 65, लोहा कोविड केअर सेंटर येथे 41, हदगाव कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 25,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 92, किनवट कोविड केअर सेंटर येथे 14, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 8, मुदखेड कोविड केअर सेटर 25,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 7, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 18, बारड कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 25, खाजगी रुग्णालयात 137 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 50 हजार 627,

घेतलेले स्वॅब- 30 हजार 566,

निगेटिव्ह स्वॅब- 24 हजार 563,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 138,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 4 हजार 325,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 2,

एकूण मृत्यू संख्या- 153,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 2 हजार 561,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 580,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 104, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 182.

 

प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News