घोटी नाल्यावरील वाहून गेलेला पर्यायी रस्ता पूल त्वरित पूर्ववत करावा संभाजी ब्रिगेडची मागणी - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 18, 2020

घोटी नाल्यावरील वाहून गेलेला पर्यायी रस्ता पूल त्वरित पूर्ववत करावा संभाजी ब्रिगेडची मागणी

 


किनवट (ऍड. विलास सूर्यवंशी) : राष्ट्रीय महामार्ग 361-A कोठारी (चि) ते धनोडा  फाटा या महामार्गावरील घोटी येथील पर्यायी पूल दुसऱ्यांदा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याने त्वरित पर्यायी रस्ता बनवून   मार्ग चालू करावा व कंत्राटदारावर तत्काळ कार्यवाही करावी. अशा अतिमहत्त्वाच्या व संवेदनशील विषयाला अनुसरून संभाजी ब्रिगेड शाखा किनवटने  उप विभागीय अधिकारी किनवट येथे नायब तहसिलदार मोहम्मद रफीक यांना मंगळवारी (दि.18) संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील घोटी व त्यांचे सहकारी संतोष डोनगे, आदित्य चव्हाण, राजेंद्र भातनासे यांनी निवेदन दिले. 

              सदर निवेदनामध्ये किनवट- माहूर महामार्गावरील घोटी येथील पुलाचे काम चालू असल्यामुळे पर्यायी बनवलेला रस्ता दुसऱ्यांदा वाहून गेल्याने तालुक्यातील अनेक गावांचा म्हणजे माहूर, विदर्भासह, तेलंगणाचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी किनवट येथे येण्यासाठी रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच शेतकऱ्यांचा दूध, भाजीपाला, नासाडी होऊन शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी लवकरात लवकर पर्यायी रस्त्याचे काम चालू करावे, त्यांच्या मालाची नुकसान भरपाई द्यावी व कंत्राटदारावर तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदनाच्या प्रति  खासदार हेमंत पाटील , आमदार भीमराव केराम व तहसीलदार  यांना देण्यात आल्या आहेत. महामार्ग कंत्राटदाराच्या नियोजन शून्य कारभारामुळे  जनतेला नाहक फटका बसत आहे ? की प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्तीचा भोंगळ कारभार जनतेवर लादल्या जात आहे किंवा कसे ? असा सवालही उपस्थित केल्या जात आहे .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News