किनवटमध्ये आज 17 बाधितांची भर, एकाचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, August 25, 2020

किनवटमध्ये आज 17 बाधितांची भर, एकाचा मृत्यू

  



किनवट  : किनवटमध्ये सोमवारी (दि. 25 ) सायंकाळी 6.00 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड एँटिजेन टेस्ट द्वारे 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 133 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 66 व्यक्तींना सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 44 रुग्ण उपचार घेत आहेत. 4 रुग्ण संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण मृत्यू संख्या 7 झाली आहे.

             आज आलेल्या तपासणी अहवालात 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. एकाचा मृत्यू झालेला आहे.

         डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 10, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 34 अशा एकूण 44 व 4 संदर्भित रुग्ण सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहेत. अशा एकूण 48 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

दि. 25/08/2020  सायंकाळी 6.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 351,

निगेटिव्ह स्वॅब-200,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या- 0

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट -59

 निगेटिव्ह अहवाल - 42

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 17


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -17

आज मृत्यू - 1

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-7, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती- 133, 

आज सुटी दिलेले-0

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-66,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44 ( + 4 संदर्भित इतरत्र उपचार घेताहेत )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News