किर्तीकुमार एच. पुजार, भा.प्र.से., सोमवारी (ता. 31 ) किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पदाची सुत्रे स्विकारणार - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 30, 2020

किर्तीकुमार एच. पुजार, भा.प्र.से., सोमवारी (ता. 31 ) किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी पदाची सुत्रे स्विकारणार

 


किनवट : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि उप विभाग, किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी पदाची सूत्रे किर्तीकुमार एच. पुजार, भा.प्र.से., सोमवारी (ता. 31 ऑगष्ट ) स्विकारणार आहेत.

               लाल बहादूर शास्त्री अकादमी , मसूरी येथील फेज-2 चे प्रशिक्षण संपवून चंद्रपूरचे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी किर्तीकुमार एच. पुजार, भा.प्र.से., राज्य शासनाकडे रुजू झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबईचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांनी ता. 24 ऑगष्ट 2020 च्या आदेशान्वये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवटचे प्रकल्प अधिकारी आणि उप विभाग, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी या परावर त्यांची नियुक्ती केली. त्यानुसार या पदांची सूत्रे किर्तीकुमार एच. पुजार, भा.प्र.से., हे सोमवारी (ता. 31 ) स्विकारणार आहेत.

               तत्पूर्वी शनिवारी (ता. 29 ) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे रुजू होऊन रात्री ते किनवटला पोहचले. त्यानंतर रविवारी(ता. 30 ) त्यांनी माहूर येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. सोमवारी (ता. 31 ) ते आपल्या पदांची सुत्रे स्विकारणार आहेत. अत्यंत प्रामाणिक , पारदर्शी, कर्तव्यकठोर प्रशासक म्हणून ते तत्पर आहेत . 

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News