129 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 301 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, August 30, 2020

129 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 301 बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

 


नांदेड (जिमाका) दि. 30 :- रविवार 30  ऑगस्ट 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 129 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 301 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 95 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 206 बाधित आले.

 

आजच्या एकुण 1 हजार 352 अहवालापैकी  964 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 6 हजार 425 एवढी झाली असून यातील 4 हजार 369 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण 71 टक्के एवढे झाले आहे. एकुण 1 हजार 792 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 176 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

 

शनिवार 29 ऑगस्ट रोजी शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 57 वर्षाचा एक पुरुष व खुदबईनगर नांदेड येथील 55 वर्षाची एक महिला तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे बाऱ्हाळी मुखेड येथील 65 वर्षाचा पुरुषाचा तर रविवार 30 ऑगस्ट रोजी लाभनगर नांदेड येथील 51 वर्षाचा एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर वजिराबाद नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालय नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

  

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 3, बिलोली कोविड केअर सेंटर 1, हदगाव कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड केअर सेंटर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 5, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 2, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 72, किनवट कोविड केअर सेंटर 1, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, मुखेड कोविड केअर सेंटर 23, खाजगी रुग्णालयातील 5 असे एकूण 129 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.   

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 37,  नांदेड ग्रामीण 4, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर 1, बिलोली 1, हदगाव 8, लोहा 21, किनवट 6, नायगाव 5, मुखेड 8, परभणी 1, हिंगोली 1, बीड 1  असे एकुण 95 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपाक्षेत्र 105,  नांदेड ग्रामीण 13, अर्धापूर तालुक्यात 4, मुदखेड 9, बिलोली 31, हदगाव 3, देगलूर 1, लोहा 8, किनवट 11, कंधार 4, नायगाव 6, मुखेड 2, उमरी 3, धर्माबाद 5, हिंगोली 1 असे एकुण 206 बाधित आढळले. 

 

जिल्ह्यात 1 हजार 792 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 187, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 616, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 51, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 28, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 72, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 150,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 47, लोहा कोविड केअर सेंटर येथे 61, हदगाव कोविड केअर सेंटर 46, भोकर कोविड केअर सेंटर 12,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 20,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 75, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 19, मुदखेड कोविड केअर सेटर 21,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 10, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 20, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 53, उमरी कोविड केअर सेंटर 46, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, बारड कोविड केअर सेंटर 6, खाजगी रुग्णालयात 227 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 17, निजामाबाद 2, मुंबई 1, हैदराबाद येथे 4 बाधित संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

सर्वेक्षण- 1 लाख 51 हजार 827,

घेतलेले स्वॅब- 45 हजार 431,

निगेटिव्ह स्वॅब- 37 हजार 54,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 301,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 6 हजार 425,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-35,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 18,

एकूण मृत्यू संख्या- 219,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 4 हजार 369,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 792,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 381, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 176. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.  


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News