किनवट : तालुक्यातील बोधडी(बुद्रूक) जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या सुनंदाबाई ओमप्रकाश दहिफळे यांचे बुधवारी (ता.०२ सप्टेबर २०२०) दुपारी नांदेड येथे खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतांना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.
आषाडी व कार्तीकीच्या पंढरपूरच्या वारीसाठी त्या कट्टर वारकरी होत्या. अगदी भोळा स्वभाव, सोज्वळ वक्तव्य, दानशूर असा विविधांगी उत्तमोत्तम त्यांचा स्वभाव होता.
आजच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दीनकर दहिफळे यांच्या त्या मातोश्री होत .




No comments:
Post a Comment