किनवट : अखंड जगातल्या लिंगायत समाजाचे अध्यात्मिक गुरु १०८ परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे मंगळवारी (दिनांक १/८२०२० ) अनंत चतुर्थीच्या दिवशी नांदेड येथे उपचारादरम्यान वयाच्या १०४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघा लिंगायत समाज शोकसागरात बुडाला आहे. त्यांना किनवट/माहूर तालुका लिंगायत समाजाच्या वतीने गजानन महाराज मंदिर सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते तथा भाजपाचे राज्यसदस्य शिवराज राघू मामा यांनी महाराजांविषयी उपस्थितांना संबोधन केले. त्यांच्या जीवन चरित्राबद्दल मार्गदर्शन पर शोक संदेश दिला. यावेळी शहरातील किशनराव दुर्केवार, संजय बिराजदार, गजानन हातगावकर, अरुण भंडारे, सतिश बिराजदार, प्रल्हाद भंडारे, संतोष ठोंबरे, चंद्रकांत भंडारे, दिलीप भंडारे, पत्रकार दत्ता जायभाये, चंद्रशेखर व्यवहारे, अनिल भंडारे, अनिल राकोंडे सहित शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीने महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.




No comments:
Post a Comment