
किनवट : वारकरी सांप्रदायात अख्ख आयुष्य वाहून घेणारे वारकरी तसेच वृत्तपत्र सृष्टीतील जेष्ठ पत्रकार बी.एल.कागणे यांची अखिल वारकरी संघाच्या किनवट तालुका सचिवपदी नियुक्त केल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. अखिल वारकरी संघाचे राज्याध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज धनेपकर यांच्या संमतीने नांदेड जिल्हाध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज लोंढे यांनी मंगळवारी (ता.१ सप्टेंबर २०२० रोजी ) नियुक्तीपत्र प्रदान केले. या नियुक्तीबद्दल सर्वस्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बोधडी (खुर्द) या जन्मगावी ह.भ.प.मैनोद्दीन गुरुजींच्या तालमीत त्यांनी संगीत शिक्षण घेतले. वयाच्या पंधरा वर्षापासून ते आजपर्यंत वारकरी सांप्रदायाचा वसा जपणा-या ह.भ.प.बी.एल.कागणे यांच्या कार्याची महाराष्ट्र राज्य अखिल वारकरी संघाने दखल घेऊन सदरची नियुक्ती केली.
किनवट तालुक्यातील सिंगारवाडी, दरसांगवी, प्रधानसांगवी, गोकुंदा, भंडारवाडी अशा ठिकाणी त्यांनी हार्मोनियम, मृदंग (पखवाज) वादन व गायन या क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले. ह.भ.प.सांडोळकर महाराज, ह.भ.प.नारायण महाराज हाळम-हेळमकर (बोधडी बु.), ह.भ.प.मारोती महाराज दिग्रसकर, ह.भ.प.उत्तम महाराज वाईकर, ह.भ.प.हरीभाऊ महाराज मुंडे प्रधानसांगवीकर, ह.भ.प.प्रेमसींग महाराज शनिवारपेठकर अशा विविध महाराजांच्या कीर्तनात त्यांनी मोलाचे कार्य केले.
बोधडी येथिल संगीतातील महामेरु ठाकरे सरांच्या भजनात साथसंगत केली. किनवट येथिल संत श्री गजानन महाराज मंदीरात, गोकुंदा येथिल एकविरादेवी मंदीरात आणि संत श्री फुलाजीबाबांच्या मंदीरात काकडा भजन, हरीपाठ, जागर असे विविध कार्यक्रम पार पाडलेत. जेष्ठ पत्रकार बी.एल.कागणे यांची तालुका सचिवपदी व सहसचिवपदी ओंकार तुकाराम माने यांची सहसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वक्षेत्रातील चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



No comments:
Post a Comment