किनवट : येथील कोविड केअर सेंटर मध्ये बाधित रुग्णांसाठी प्रशासनाने सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली असून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय अधिकारी व सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांनी आमची काळजी घेऊन आम्हाला दिलेली आपुलकीची वागणूक यातून आम्हाला उर्जा मिळाली, आम्ही आता ठणठणीत बरे झालो असून या व्यवस्थापन प्रक्रियेतील सर्वांचेच आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया येथे औषधोपचार घेणाऱ्या बाधित रुग्णाने दिली आहे .
जाणून घेऊ या त्यांचं मनोगत त्यांच्याच शब्दात ...
" मी विजय व्यंकटराव सातुरवार, सह शिक्षक, स. वि. मं. प्रा. शाळा,किनवट ...
माझी दिनांक 29 ऑगस्टरोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली. मी त्या दिवसापासून किनवट येथील तहसील कार्यालयात स्थापीत कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहे. आज मला इथे येऊन नऊ दिवस झालेत. माझी तब्येत एकदम मस्त आहे आणि त्याचं कारण म्हणजे येथील वातावरण, नियोजन आणि व्यवस्थापन.
अत्यंत सुव्यवस्थित नियोजन आहे. प्रत्येक गोष्टीत इथे बारकाईने लक्ष दिल्या जाते. सकाळी चहा (उत्तम), नंतर लगेच नाष्टा व पुन्हा सर्व रुग्णांची तपासणी करून दुपारी बारा वाजता जेवन. सर्व परिसराची साफ-सफाई, रोज स्वच्छतागृह व बाथरूमची सफाई केल्या जाते. पिण्यासाठी शुद्ध मिनरल पाण्याची उत्तम व्यवस्था. दुपारी पुन्हा चहा आणि रात्री 8.30 वाजता पुन्हा रात्रीचं जेवन . प्रत्येक गोष्ट टाईम -टू - टाईम आणि उत्तम ....
मी हा मेसेज लिहिण्याचे कारण की, आपणापैकी जे कोणी किंवा कोणाचे नातलग जर का पॉझिटिव्ह निघालेही असतील तर त्यांना घाबरून जाऊ न देता किंव्हा तुम्ही गोंधळून न जाता बिलकुल चिंता न करता राहू शकता. कारण माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे की, किनवटचे कोविड केअर सेंटर आपली उत्तम प्रकारे काळजी घेण्यास सक्षम आहे .
उद्या मला इथून डिस्चार्ज मिळत आहे. मी व माझ्या सोबत माझे काका आणि आमचे शेजारी प्रमोद स्वामी आम्ही तिघेजन बिलकुल सुदृढ आणि आनंदी वातावरणात इथून निरोप घेत आहोत.
मी सर्व प्रथम कोविड केअर सेंटरच्या इन्चार्ज डॉ. वाघमारे मॅडम यांचे व त्यांची सर्व टीम नर्सेस, कमपौंडर. नगर पालिकेतील सफाई कर्मचारी तसेच इथे सर्व सुविधा पुरविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद देऊ इच्छितो ....
तसेच सगळ्यात महत्वाचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नगर अध्यक्ष आनंदभाऊ जे प्रत्येक क्षणी आपल्या सगळ्यांसोबत खंबीर पणे उभे आहेत. प्रत्येक कामात एका क्षणात उपस्थित असतात. त्यांचं एक उदाहरण म्हणजे पर्वा 4 सप्टेंबरला दुपारी 3 वाजतापासून विद्युत पुरवठा नव्हता आणि 7 वाजपर्यंत इन्व्हर्टर वेवस्था असल्यामुळे आमच्या लक्षात सुधा आलं नाही की, विद्युत पुरवठा नाही म्हणून, जेंव्हा पाणी संपलं तेंव्हा ही बाब आमच्या लक्षात येताच नगराध्यक्षांना कॉल केला आणि फक्त म्हटलो की, दादा इथे लाईट गेली. ते स्वतः महाविरणच्या लाईनमनला घेऊन 10 मिनीटात इथे उपस्थित झाले आणि अवघ्या 15 मिनीटात लाईटची व्यवस्था करून दिली, ही त्यांची तत्परता ...
पुन्हा एकदा किनवट कोविड केअर सेंटरच्या सर्व टीमचे खूप खूप आभार !
- विजय व्यंकटराव सातुरवार,
सह शिक्षक,
स.वि.मं., प्राथमिक शाळा, किनवट
(9850084552 )
सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांच्या मार्गदर्शना खाली तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गट विकास अधिकारी सुभाष धनवे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार आदी अधिकारी कोविड केअर सेंटरला योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत.





No comments:
Post a Comment