किनवटमध्ये रविवारी (ता. सहा ) 8 बाधितांची भर - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, September 6, 2020

किनवटमध्ये रविवारी (ता. सहा ) 8 बाधितांची भर

 


किनवट  : किनवटमध्ये रविवारी ( ता. 06) सायंकाळी 5.00 वाजता प्राप्त माहिती नुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 8  रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 244  झाली आहे. आजपर्यंत 120 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 76 रुग्ण उपचार घेत आहेत. 19 जण होम क्वारंटाईन आहेत.  

       आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या एस.व्ही.एम. कॉलनी येथील 26 वर्षाचा 1 पुरुष, 50 वर्षाची 1 महिला, 30 वर्षाची 1 महिला, गोकुंद्यातील एकविरानगर येथील 56 वर्षाचा 1 पुरुष, 20 वर्षाचा 1 पुरुष, मांडवा येथील 23 वर्षाचा 1 पुरुष व सारखणी येथील 34 वर्षाची 1 महिला, 38 वर्षाची 1 महिला अशा 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

       आज नवे रुग्ण आढळल्याने सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांनी सारखणी गावाला कंटेन्मेंट झोन जाहिर केले आहे. या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.

             

         डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 28, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 48 व होम क्वारंटाईन 19 अशा एकूण 95 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.


किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे

ता. 06/09/2020 सायंकाळी 05.00 वाजता


आरटीपीसीआर टेस्ट

घेतलेले एकूण स्वॅब- 506,

निगेटिव्ह स्वॅब- 365,

आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-0,

स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 57 ,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजेन टेस्ट

ऍन्टिजन टेस्ट - 31,

 निगेटिव्ह अहवाल - 25,

आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल -6,


आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण - 8 (2 माहूर येथे पॉझिटिव्ह ),

आज मृत्यू - 0,

आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 10, 

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -244, 

आज सुटी दिलेले-0,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 120,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 76 (19 होम क्वारंटाईन  )

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News