मुंबई, दि. 7 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आज सोमवारी 7 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 11 वाजता तर विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात दुपारी 12 वाजता ' वंदे मातरम्'ने करण्यात आली.
विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती
मुंबई, दि.7 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेत तालिका अध्यक्षांची नियुक्ती विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आज केली. आमदार सर्वश्री बालाजी किणीकर, दौलत दरोडा, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
विधानपरिषदेत नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय
मुंबई,दि. 7:– विधानपरिषदेतउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सभागृहाला परिचय करून दिला. सदस्य श्रीमती डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे, सर्वश्री शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रवीण प्रभाकरराव दटके, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडिराम राठोड या नवनिर्वाचित सदस्यांचा यात समावेश आहे.
विधानपरिषद तालिका सभापती जाहीर
मुंबई, दि. 7 :- विधानपरिषदेतश्रीमती डॉ. मनिषा कायंदे, सर्वश्री प्रसाद लाड, संजय दौंड, अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषदेत यासंदर्भातील घोषणा केली.




No comments:
Post a Comment