कृषीच्या अंतीम वर्षातील शुशांत ठमके यांनी शेतकऱ्यांना दिले " निंबोळी अर्क " " टोमॅटो केचअप " चे प्रात्यक्षिक - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 7, 2020

कृषीच्या अंतीम वर्षातील शुशांत ठमके यांनी शेतकऱ्यांना दिले " निंबोळी अर्क " " टोमॅटो केचअप " चे प्रात्यक्षिक

 


किनवट : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे -05 या महाविद्यालयातील अंतीम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोविड -19 प्रादुर्भावामुळे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट " रावे " हे प्रत्येकाच्या स्थानीक ठिकाणी करणेबाबत विद्यापीठाने निर्देश दिलेले आहे . 

           त्याअनुषंगाने ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत सदर महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील येथील विद्यार्थी शुशांत प्रशांत ठमके यांनी मौजे नागझरी ता.किनवट जि.नांदेड येथील प्रगतीशिल शेतकरी सौ.करूणा बागेश्वर यांचे शेतात “ निंबोळी अर्क " बनविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले व पिकांवर फवारणी करून दाखविली . 

           “ निंबोळी अर्क " हे जैविक किटकनाशक असून त्याचे मातीवर व पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही . कडूनिंबाच्या झाडापासून मोफत मिळणारी निंबोळी व इतर साहित्य वापरूनच अत्यल्प खर्चात हे किटकनाशक बनवून उत्तम शेती करावी , असे आवाहन त्यांनी केले . तसेच शेतातून मिळणारे टोमॅटोपासून अधिक फायदा देणारे " टोमॅटो केचअप " बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले . यामुळे बाजारामध्ये टोमॅटोस योग्य ते दाम मिळत नसल्यास “ टोमॅटो केचअप ” बनविणे अत्यंत फायदेशीर ठरते. यावेळी शंकर जाधव, देविदास मुनेश्वर , ग्यानदेव भोयर , मनोज भोयर , सागर बोलेनवार , तुळशीराम वाडगुरे , दत्ता सिदनवाड , करण सुंकलवाङ , नागरगोजे , जाधव आदिंची उपस्थिती होती .

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News