नांदेड : येथील पाटबंधारे नगरमधील रहिवासी गोविंदराव राजाराम लोकडे यांचे मंगळवारी (ता. 8 ) ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते 65 वर्षांचे होते.
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये ते उच्च पदावर दीर्घकाळ सेवारत होते. प्रतिकूलतेतून त्यांनी स्वत: ला उभे केले होते. कळमनुरी तालुक्यातील वडगावचे ते मूळ रहिवासी होते. बॅंकेतील सेवाकाळात त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल अनेकदा गौरविण्यात आले होते. सामाजिक आणि धम्मकार्यात ते सक्रीय होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे.
बुधवारी (ता.9) सकाळी 10 वाजता गोवर्धन घाट येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद नांदेडचे सहायक प्रकल्प अधिकारी डॉ. विलास ढवळे यांचे ते व्याही होत .




No comments:
Post a Comment